मुंबई: सकाळच्या सत्रात शेअर बाजारातील घसरण अखेरच्या सत्रात कायम राहिली आहे. बाजारातील अस्थिरतेचा फटका गुंतवणूकदारांना बसला आहे. सेन्सेक्स ६०९.६८ अंकांने व निफ्टी २२५.९० अंकांनी मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात अखेरच्या सत्रात झालेल्या तुफान घसरणीचा फटका बाजारात आणखी गुंतवणूकदारांना बसला. मिड व स्मॉलकॅप शेअर्समध्ये लार्जकॅप शेअर्ससह घसरण झाल्याने बाजारात फटका बसला. युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची अपेक्षा कायम असताना अस्थिरतेचा फटका भारतीय बाजारासह आशियाई बाजारातही बसला आहे.
अखेरीस मिडिया (२.७३%), पीएसयु बँक (२.८१%), हेल्थकेअर (१.४२%) समभागात सर्वाधिक घसरण झाली आहे. अखेरच्या सत्रात लेटंट व्ह्यू (१०.३०%), निवा बुपा हेल्थ (२.६४%), ३एम इंडिया (२.३२%), होम फर्स्ट फायनान्स (२.२०%), आयटीआय (१.४६%) समभागात झाली आहे तर सर्वाधिक घसरण केईंस इंडिया (१२.५५%), इंटरग्लोब एव्हिऐशन (८.३२%), होनसा कंज्यूमर ड्युरेबल्स (६.७६%),डेटा पँटर्न (६.४७%), सारेगामा इंडिया (६.४७%), रिलायन्स पॉवर (६.५०%), हुडको (५.५२%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' या आठवड्याच्या फेड धोरण निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याने बाजाराने व्यापक पातळीवर घसरण अनुभवली, २६००० पातळीच्या खाली घसरण झाली. मजबूत देशांतर्गत वाढीचे आकडे आणि आरबीआयच्या अलिकडच्या दर कपातीनंतरही, जागतिक चलनविषयक धोरणांच्या चिंता, सततचा एफआयआयचा बहिर्गमन आणि चलन अवमूल्यन यामुळे अल्पकालीन भावनांवर सावली आहे. जपानी बाँड उत्पन्नात अनेक वर्षांच्या उच्चांकी वाढ झाल्यामुळे अस्थिरता आणखी वाढली, ज्यामुळे येन कॅरी ट्रेडमध्ये संभाव्य मंदीची भीती निर्माण झाली.'