यावर्षीचा शेवटचा पोको C85 5G उद्या भारतात लाँच होणार

मुंबई: लोकप्रिय ब्रँड पोकोने पोको सी८५ ५जी च्‍या लाँचची घोषणा केली असून उद्यापासून हा स्मार्टफोन बाजारात दाखल होत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२५ मधील हा प्रोडक्टलाईन मधील शेवटचा फोन असणार आहे. तरूणांसाठी डिझाइन करण्‍यात आलेला पोको सी८५ मध्‍ये विश्वासार्ह पॉवर, विश्वसनीयता आणि दिवसभर कार्यरत राहण्‍याची क्षमता आहे. फ्लॉण्‍ट युअर पॉवरसाठी या डिवाईसमध्‍ये सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत असा दावा कंपनीने केला आहे. केव्‍ही अनावरणाचा भाग म्‍हणून पोको इंडियाच्‍या सोशल मीडिया चॅनेल्‍सवर पोको सी८५ ५जीचा पहिला लुक लाइव्‍ह प्रसारित करण्‍यात आला आहे. स्‍मार्टफोन अधिकृतरित्‍या भारतात मंगळवार उद्या ९ डिसेंबर २०२५ रोजी लाँच करण्‍यात येईल.


यावेळीही आपली खासियत कंपनीने सुरू ठेवली असून जबरदस्त बॅटरीसह हा फोन देखील टेक युजर्ससाठी बाजारात आवतरेल. यासह जलद चार्जिंग सुविधा असून हा फोन पातळ असणार आहे. यंदा एफ७, एक्‍स७ सिरीज आणि एम७ प्‍लस अशा लाँचेससह ब्रँडने बॅटरी कार्यक्षमता वाढवण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. त्यातील अपडेटेट आवृत्ती म्हणून स्वाभाविकच या फोनचा विचार ग्राहक करू शकतात.


कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटल्याप्रमाणे, या स्मार्टफोनचे मुख्य लक्ष्य हे तरूण वयोगटातील असतील. पोको सी८५ (Poco C85) ५जी तरूण स्‍मार्टफोन वापरकर्त्‍यांच्‍या दैनंदिन गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे जेथे विश्वसनीयता, दीर्घकाळापर्यंत टिकाऊपणा आणि स्‍टाइलवर लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे.आकर्षक ड्युअल-टोन फिनिश आणि स्‍लीक, स्लिम प्रोफाइलसह पोको सी८५ ५जी भारतीयांच्‍या व्‍यस्‍त जीवनशैलीशी जुळण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आला आहे असे कंपनीने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.


फिचर्स पाहता या डिवाईसमध्ये ६००० एमएएच बॅटरी, तसेच ३३ वॅट फास्‍ट चार्जिंग आणि १० वॅट रिव्‍हर्स चार्जिंग डिवाईस यांचा भरणा आहे. कंपनीच्या दाव्यानुसार दोन दिवस सहज ही बॅटरी सामान्य वापर करत असलेल्या युजरला पुरणार आहे.POCO C85 5G मध्ये 6000mAh ची बॅटरी असेल जी 33W फास्ट-चार्जिंगला सपोर्ट करेल. ब्रँडने असा दावा केला आहे की हे डिव्हाइस एका चार्जमध्ये दोन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकू शकते. 10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट असेल. फोनमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक देखील असल्याचे दिसते. फ्रंट कॅमेरा सेन्सर ठेवण्यासाठी, एक टियरड्रॉप नॉच आहे. मागील कॅमेरा कटआउटमध्ये फ्लॅशसह दोन कॅमेरे असल्याचे दिसते.


Comments
Add Comment

आता असूचीबद्ध शेअर सेबी रडारवर? पांडे यांचे मोठे विधान

सेबी सूचीबद्ध नसलेल्या शेअर बाजाराचे नियमन करण्यावर विचार करू शकते- तुहिन कांता पांडे प्रतिनिधी: सध्या

Nitesh Rane : हाहाहा, हीहीही..."उद्धवजी आणि पेग्विनला"; जय श्रीराम!"... नितेश राणेंनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

मुंबईत महायुतीची मुसंडी पाहताच भाजपचा प्रहार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीत महायुतीने (भाजप-शिंदे गट)

WPI Inflation: घाऊक ग्राहक किंमत महागाईत डिसेंबरमध्ये किरकोळ वाढ 'या' कारणामुळे

मोहित सोमण: प्राथमिक उत्पादन खर्चात वाढ झाल्याने यंदा घाऊक ग्राहक किंमती निर्देशांकात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ०.८६%

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना

BMC Election Result 2026 : मुंबईत 'महायुती'चा झंझावात! भाजप-शिंदे गटाने गाठलं 'शतक'; महापालिकेत सत्तांतराचे स्पष्ट संकेत

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आज मोठा उलटफेर पाहायला

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या