नगर परिषदेच्या निकालापूर्वीच महापालिकेसाठी मनोमिलन

वसई-विरारमध्ये महायुती एकत्र लढण्याचे संकेत


गणेश पाटील विरार : पालघर जिल्ह्यात नुकतेच पार पडलेल्या नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी वसई-विरार महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढण्याचे संकेत दिले आहेत. महापालिका निवडणुकीच्या अानुषंगाने दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक शनिवारी वसई-विरारमध्ये पार पडली आहे.

राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. हे गल्लीपासून तर दिल्लीतील राजकारणातील विविध घडामोडींवरून अनेकदा स्पष्ट झाले आहे. राज्यात नुकतेच नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती महायुतीच्या फुटीरतेची. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वांनीच आपल्या राजकीय पक्षाच्या उमेदवारासाठी एकमेकांविरुद्ध प्रचार केला. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली प्रचार सभा तर राज्याच्या कानाकोपऱ्यात गाजली. "अहंकार आणि लंका दहन" या विषयावर शिंदे आणि फडणवीस यांनी केलेले भाष्य महाविकास आघाडीतील काही नेत्यांसाठी आयते कोलीत हाती लागल्यासारखे होते.

कार्यकर्त्यांमध्ये ही लढाई निकालानंतर सुद्धा सुरूच राहणार असली तरी, वरिष्ठ नेत्यांकडून मात्र निवडणूक संपली विषय संपला असाच संदेश दिल्या जात आहे. तथापि, वसई विरार महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली आहे. एकत्र लढून महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी या बैठकीत ऊहापोह करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वसई विरारचे भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार राजन नाईक आणि शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत ही बैठक झाल्याने, महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत.या बैठकीसाठी आमदार विलास तरे, शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश तेंडोलकर, वसंत चव्हाण, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा पाटील, माजी जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील, शिवसेना जिल्हा सरचिटणीस अतुल पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सुदेश चौधरी उपस्थित होते.
Comments
Add Comment

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये आज आणि उद्या वाहतूक निर्बंध

पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चा व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा

पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छीमाराचा मृत्यू

शिक्षा पूर्ण होऊनही कैदेत ठेवण्याचा अमानवी प्रकार पालघर : शिक्षेचा कालावधी संपून तब्बल साडेतीन वर्षे उलटूनही

प्रजासत्ताक दिनापर्यंत नव्या महापौरांची निवड शक्य नाही

झेंडावंदनाचा मान मिळणार प्रशासकांनाच आगामी आठवड्यात ठरणार महापौर पदाचे आरक्षण विरार : वसई-विरार महापालिकेत

वसई-विरार महापालिकेत निवडले जाणार १० स्वीकृत सदस्य

महायुतीला चार, तर बविआला मिळणार सहा जागा गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिकेच्या ११५ सदस्य संख्येच्या

महापालिकेच्या सभागृहात भाजपचे ४० नवे चेहरे

बविआच्या २६ माजी नगरसेवकांना मतदारांची पुन्हा पसंती विरार : वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता

हजारापेक्षा कमी मतांच्या फरकाने १५ उमेदवारांचा पराभव

बविआच्या १२ तर भाजपच्या ३ उमेदवारांचा समावेश गणेश पाटील, विरार: वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या ११५