रुद्राणी घोडी १ कोटी १७ लाख रुपयांत

नंदुरबार : नंदुरबारमधील सारंगखेड्याच्या घोडेबाजारात एक से बढकर एक घोडे दाखल होत आहे. त्यातच उत्तर प्रदेशच्या महेश्वर येथून आलेली रुद्राणी नावाची घोडी दाखल झाली असून या घोडीची किंमत हजारो आणि लाखात नव्हे तर करोडो रुपये आहे. पंजाबच्या पुष्कर येथे रुद्र आणि या घोडीला एका अश्वप्रेमींनी एक कोटी १७ लाखात मागणी केली होती. मात्र या घोडीचे मालक विजय यादव यांनी ही घोडी विकण्यास नकार दिला होता. या घोडीत असं काय खास आहे, ज्यामुळे त्या घोडीची किंमत तब्बल एक कोटी १७ लाख रुपये आहे. सारंगखेड्याच्या यात्रेत रुद्रणी घोडी दाखल झाली असून ती रुद्राश चेमपूरवालेची मुलगी आहे आणि राज नगीनाची नात आहे. ही रुद्राणी अवघ्या २२ महिन्याची आहे. मात्र तिची उंची ६५ इंचपेक्षा अधिक असल्याने ती पूर्ण घोडे बाजारात सर्वात उंच घोडी आहे. रुद्राणी घोडी जितकी सुंदर आहे तितकाच तिचा खुराकदेखील आहे. रुद्राणीला रोज ८ लीटर गाईचे दूध, बिसलरी पाणी, गहू आणि हरभऱ्याच्या भुसा दिला जातो. सकाळ-सायंकाळी तिची चांगल्या पद्धतीने एक तास मालिश केली जाते. त्यानंतर तिला खायला १०० ग्रॅम मोहरीचं तेलं दिलं जातं. संगखेड्याच्या बाजारात रुद्राणी घोडी विक्रीसाठी आलेली नाही. मात्र तिला पाहायचे असणार तर एकदा आश्वांच्या पंढरीत भेट देण्याचे आवाहन केले जात आहे.

Comments
Add Comment

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

तापमानचा पारा घसरणार, राज्यात भरणार हुडहूडी!

मुंबई: देशात सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. मात्र उत्तर भारतात सध्या दाट धुक्याची चादर पसरली

हद्दपार गुंडाने शहरात वास्तव्य करत केला महिलेवर बलात्कार! पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह

पुणे: पु्ण्यात गुन्हेगारी क्षेत्रातील वाढ नवीन नसली तरी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या

थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवणं पडणार महागात; RTO नवे नियम लागू

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्यांवर आता थेट कारवाई

जेलमधून लढवणार निवडणुक, बंडू आंदेकरचा नवा राजकीय प्रवेश

पुणे : पुण्यातील गँगवॉरला कारणीभूत ठरलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरने आता राजकीय