'इंडिगो'वर कारवाई होणारच; मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विधान

पुणे : इंडिगो एअरलाईन्सने घातलेल्या गोंधळामुळे प्रवाशांना तब्बल सहा दिवसांपासून तिष्ठत ठेवले आहे. विमानतळावर सकाळपासून प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. केंद्रीय नागरी विमान उड्डाण मुरलीधर मोहोळ यांनीही ''चुकीला माफी नाही, कठोर कारवाई होणारच'', असा इशारा दिला आहे. इंडिगोच्या ढिसाळ व्यवस्थेमुळे प्रवाशांचे हाल झाले. पायलट संघटनेने आधीच मागणी केली होती की ड्युटीचे तास कमी करावेत. डीजीसीएनेही त्यावर आदेश दिले. इतर विमान कंपन्यांनी ते ताबडतोब लागूही केले. दोन टप्प्यांत बदल करायचे ठरले होते. पण इंडिगो मात्र शेवटच्या क्षणापर्यंत झोपेतच होती, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले. या गोंधळाला इंडिगो एकटं जबाबदार,” असे त्यांनी ठामपणे म्हटले. कामाचे तास अचानक १० वरून ८ झाले. या दोन तासांच्या फरकामुळे पायलट आणि कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता निर्माण झाली. १ नोव्हेंबरपासूनच इंडिगोवर हा ताण वाढत गेला आणि शेवटी त्यांची संपूर्ण यंत्रणाच कोसळली. नागरी उड्डाण मंत्रालयाने याची दखल घेतली असून, तात्पुरते नियम लागू करून फेब्रुवारीपर्यंत यंत्रणेला स्थगिती देण्यात आली आहे. डीजीसीएने या प्रकरणात ४ सदस्यांची चौकशी समिती नेमली आहे. प्रवाशांसाठी कंट्रोल रूमही स्थापन केली आहे. इंडिगोला नोटीस बजावली असून- ”कुठलीही चूक माफ केली जाणार नाही. जे आवश्यक असेल ते करू,” असा इशारा मोहोळ यांनी दिला. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Pune Press Club : पुणे प्रेस क्लबसाठी सेनापती बापट मार्गावर प्रशस्त जागा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय!

* महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार * आठ हजार चौ.फुटावर सुसज्ज इमारत उभारणार नागपूर : पुणे पत्रकार

मिलिंद साठे राज्याचे नवे महाधिवक्ता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

नागपूर : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्या राजीनाम्यानंतर नवे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांच्या

Baba Aadhav | ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढावांची प्रकृती गंभीर, रुग्णालयात दाखल

पुणे : श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक आणि कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती

‘बिबट्या कसा पकडायचा?’ ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांचा पुण्यात मास्टरक्लास

पुणे : पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मानव-बिबटयामधील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. मोकाट फिरण्याऱ्या बिबट्याचा शोध

रुद्राणी घोडी १ कोटी १७ लाख रुपयांत

नंदुरबार : नंदुरबारमधील सारंगखेड्याच्या घोडेबाजारात एक से बढकर एक घोडे दाखल होत आहे. त्यातच उत्तर प्रदेशच्या

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या