२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार

मंत्री एस. जयशंकर यांची राज्यसभेत माहिती


नवी दिल्ली : अमेरिकेने २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार केले. यात जानेवारी २०२५ पासून हद्दपार केलेल्या ३,२५८ भारतीयांचा समावेश आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितले.


पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, मानवी तस्करीच्या प्रकरणांची चौकशी राज्यांनी तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केली आहे. यात पंजाबमध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे. २०२३ मध्ये ६१७ भारतीयांना आणि २०२४ मध्ये १,३६८ भारतीयांना हद्दपार करण्यात आले, असे मंत्र्यांनी सांगितले. जानेवारी २०२५ पासून अमेरिकेने एकूण ३,२५८ भारतीय नागरिकांना हद्दपार केले आहे. यापैकी २,०३२ भारतीय (अंदाजे ६२.३ टक्के) नियमित व्यावसायिक उड्डाणांनी परतले आणि उर्वरित १,२२६ भारतीय (३७.६ टक्के) यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (आयसीई) किंवा कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन (सीबीपी)द्वारे चालवल्या जाणाऱ्या चार्टर विमानांनी परतले,
असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात