प्रभादेवीतील साई सुंदर नगर आणि कामगार नगर दाेनमधील नाल्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

नाल्याच्या रुंदीकरण कामासाठी विकासकाची केली नियुक्ती


मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील प्रभादेवी येथील साई सुंदरनगर, कामगारनगर -२ व इतर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील अस्तित्वात असलेल्या पर्जन्य जलवाहिनीचे रुंदीकरण करून त्यांचे बांधकाम केले जाणार आहे. या नाल्याच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येत असून महापालिकेने यासाठी विकासक असलेल्या स्कायलार्क बिल्डकाॅन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड केली आहे. या नाल्याचे रुंदीकरण करण्यासाठी तब्बल सुमारे ५० काेटी रुपये खर्च केले जाणार आहे.


साई सुंदरनगर सहकारी गृहनिर्माण संस्था या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेस प्रथमतः १९९८ साली झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणामार्फत मंजूरी देण्यात आली होती. अंतिम भूभाग क्र १०७८ मधील एकूण १७२७४.२२ चौ.मी.एवढृया क्षेत्रावरील भूभागावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना मंजूर केली. ड्रेनेज आणि रस्त्याच्या संपूर्ण कामाचा खर्च ७५ टक्के महापालिका आणि २५ टक्के सोसायटी तथा विकासक या प्रमाणात वाटून घेतला जाईल आणि २५ टक्के महानगरपालिकेने ठरवल्याप्रमाणे महानगरपालिकेला आगाऊ ठेव म्हणून द्यावी असे निश्चित करण्यात आले हाेते. सन १९९८ साली मुळ मंजूर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये लगतच्या वेगवेगळ्या अनुक्रमे ९ गृहनिर्माण संस्था कालांतराने समाविष्ट करून मुळ झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे क्षेत्र वेळोवेळी वाढविण्यात आले आहे. अलीकडेच कामगार नगर-२ व माहिम नगर विकास योजना क्र.४ मधील अंतिम भूभाग क्र. १०७८ वरील शिव सम्राट गृहनिर्माण संस्था या योजनेमध्ये समाविष्ठ करण्यात आली आहे.




डॉ. ऍनी बेझंट रस्ता येथील सुमारे ८०० मी. लांबीच्या रस्त्याचे व नाल्याचे काम यात अंतर्भूत होते. राज्य शासनाच्या सन २००५ रोजीच्या अधिसूचनेमध्ये समाविष्ट असलेल्या नाल्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. तर नाल्याच्या कामासाठी एकूण खर्चाच्या ८४.२१ कोटीपैकी रुपयांपैंकी ६३.५५ कोटी रुपये एवढी रक्कम आजतागायत खर्च करण्यात आली आहे. दरम्यान, कामगार नगर-२ या झोपडपट्टीतील अस्तित्वातील नाला वळवून शिवडी वरळी उन्नत मार्गाच्या खांब क्र.८४ ते खांब क्र.८८ यांच्या रेषेत करण्याची विनंती एमएमआरडीएला एसआरएच्या अधिकारयांनी केली हाेती. त्यानुसार अस्तित्वातील नाला वळवतांना जुन्या नाल्याचे बांधकाम हे शिवडी वरळी उन्नत मार्गाच्या रेषेत करताना खांबाच्या पायाभोवती सुरक्षित अंतर ठेवून करण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता.

नव्याने समाविष्ट कामगार नगर-२ मधील एसअाए प्रकल्पामध्ये सुमारे २००० झोपड्या बाधित असून त्यांना नवीन इमारतीमध्ये त्यांना सामावून घ्यायचे आहे. या झोपडी धारकांनी अस्तित्वात असलेल्या नाल्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नाल्याची देखभाल आणि नाल्यातील गाळ काढणे शक्य होत नाही. तसेच नाला धोकादायक स्थितीत असल्याने त्याची दुरुस्ती व पुर्नबांधणी करणे आवश्यक आहे. हा नाला हिंदमाता मार्केट व दादर पुर्वेकडील पावसाळी पाण्याचा विसर्ग होण्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे या नाल्यावरील अतिक्रमण हटवून त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी महापालिकेने संबंधित विकासकाचीच निवड करून त्यांच्या मार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. या नाल्याच्या रुंदीकरणासाठी सुमारे ४९.३५ काेटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा

Goregaon Mulund Link Road : गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांच्या भूमिगत मार्गासाठी तुळशी सरसावला

बोगदा प्रकल्प खोदकामााल सोमवारी १७ ऑगस्ट रोजी झाला प्रारंभ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका

Mumbai News : 'आमचे मृतदेह घेऊन जा', कुलाबा सामूहिक मृत्यू प्रकरणात नवे खुलासे

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगरमधील सामूहिक मृत्यू प्रकरणाच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. या

BEST Employees Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप; सकाळी ११.३० वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार असलेल्या बेस्ट सेवेवर आजपासून संपाचे सावट आले आहे.

Maharashtra Weather Alert : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; पुढील काही दिवस पावसाला ब्रेक?

मुंबई : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील