शैक्षणिक सहली, लग्नसमारंभांसाठी 'लालपरी' सुसाट

खासगी वाहनांपेक्षा एसटीतून होणार पारदर्शक आणि सुरक्षित प्रवास


स्वप्नील पाटील पेण : नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या दरम्यान अनेक शैक्षणिक सहली आणि त्यातच लग्नसमारंभाचा सीजन असल्याने या दोन महिन्यात एसटीच्या प्रासंगिक कराराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बुकिंग होत असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रायगड विभागाची एसटी प्रासंगिक कराराच्या माध्यमातून सुसाट धावत असून नोव्हेंबर महिन्यात एसटीच्या रायगड विभागाच्या ९४ बसेस बुक झाल्या. या बुकिंगच्या माध्यमातून एसटीने महिनाभरात ३६५७७ किमीचा प्रवास करून प्रवाशांची तसेच विद्यार्थी आणि समारंभातील कुटुंबीयांची सेवा केली आहे. त्यामुळे खासगी वाहनांपेक्षा एसटीच्या माध्यमातून आपला प्रासंगिक करार करून पारदर्शक आणि सुरक्षित प्रवास यापुढे देखील प्रवाशांनी करावा असे आवाहन रायगड विभाग नियंत्रक डॉ. सुहास चौरे यांनी प्रवाशांना केले आहे. महाराष्ट्राला लाभलेली धार्मिक संस्कृती, गडकिल्ले आणि कोकण किनारपट्टीवर असणारी असंख्य पर्यटन स्थळे यामुळे अनेक शैक्षणिक सहली अशा ठिकाणी प्रामुख्याने जात असतात. त्यातच याच दरम्यान सुरू असणारे लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांसाठी लांबचा आणि असंख्य प्रवाशांचा प्रवास असेल तर एकावेळी अनेक गाड्या नेण्यापेक्षा अनेक कुटुंब एसटी सोबत प्रासंगिक करार करून आपला सुखाचा प्रवास करत असतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या प्रासंगिक कराराच्या माध्यमातून रायगडाची एसटी सुसाट धावताना दिसत आहे. नोव्हेंबर महिन्यात रायगड जिल्ह्यातील आठ आगारांच्या माध्यमातून एसटीच्या ९४ गाड्या बुक झाल्या असून सवलतीच्या ५४, तर विनासवलतीच्या ४० बसेस बुक झाल्या आहेत. तर या ९४ बसेसने सवलतीच्या माध्यमातून २५२८९ किलोमीटर आणि विनासवलतीच्या माध्यमातून ११,२८८ असा एकूण ३६,५७७ किमीचा प्रवास केला असल्याने रायगड विभागाच्या एसटीला प्रासंगिक कराराच्या माध्यमातून असणारी पसंती सहजपणे लक्षात येते.


...असा आहे एसटीचा प्रासंगिक करार फायदेशीर




  1. परवडणारा खर्च, प्रतिव्यक्ती खर्च कमी, इंधन, चालक, मानधन, टोल, पार्किंग यांचा स्वतंत्र खर्च नाही .

  2. अनुभवी चालक, नियमित वाहन तपासणी, सरकारी नियमांचे पालन, सुरक्षित आणि विश्वसनीय प्रवास

  3. कायदेशीर आणि विश्वास, सरकारी संस्था असल्याने फसवणूक नाही, परवानगी, विमा, फिटनेस सर्व कायदेशीर व अद्ययावत .

  4. सर्वांना एकत्र नेण्याची सोय, एसटी वर्क शॉप आणि डेपो सर्वत्र असल्याने तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा. जलद मिळते, खासगी वाहन बिघडल्यास पर्यायी वाहन मिळणे कठीण.

  5. प्रवाशांसाठी विमा संरक्षण उपलब्ध, अपघात, अडचणी, जबाबदारी ठरलेली असते.

  6. अधिकृत दरसूची, पावती व करारपत्र, ऑनलाइन तसेच डेपोवार सोपा करार.


खासगी वाहनांपेक्षा सरकारी संस्था असणाऱ्या आणि गरिबांच्या खिशाला परवडणाऱ्या एसटीचा प्रवास हा प्रवाशांच्या दृष्टिकोनातून नेहमीच फायदेशीर ठरला आहे. एखादी सहल किंवा लग्नसमारंभारखा एखादा कौटुंबिक कार्यक्रम असेल तर त्यासाठी देखील एसटीचा अधिकृत आणि पारदर्शक करार करून एसटीचाच प्रवास करा आणि आपला सुखकर तसेच आर्थिक बचत करून प्रवास करा. - डॉ. सुहास चौरे ( विभाग नियंत्रक - रायगड )

Comments
Add Comment

Jalgaon : स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी ? जळगावात महावितरणकडून दोघांविरोधात गुन्हे दाखल

Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर

Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट

Jalgaon : भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल, भुसावळ विभाग ३३ कोटींच्या महसुलासह दुसऱ्या क्रमांकावर

Jalgaon : आजपर्यंत आपण तिकीट विक्री किंवा तिकीट तपासणी मधून रेल्वे विभागाने (Central Railway) कोटींची कमाई केल्याचे ऐकले असेल,