इंदू मिलच्या जागेत महामानवाचे स्मारक प्रगतिपथावर

प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्राची संरचनात्मक कामे पूर्ण

मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक दादर येथील इंदू मिलच्या जागेत आकाराला आले आहे. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) १२ एकर जागेत एक हजार ०८९ कोटी रुपये खर्चून हे स्मारक साकारले जात आहे. या स्मारकातील प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृह, वाहनतळाची शंभर टक्के स्ट्रक्चरल कामे झाली आहेत. सध्या अंतर्गत सजावटीची कामे प्रगतिपथावर असून, बाह्य विकासाची कामेही सुरू आहेत. त्यामुळे वर्षभरात हे दिमाखदार स्मारक खुले होणार आहे.

डॉ. बाबासाहेब यांनी दिलेला समतेचा संदेश जगभरात पोहोचावा, त्यांचे अनमोल कार्य, कायद्याचा अभ्यास, बहुजनांसाठी हक्कासाठी दिलेला लढा आदी बाबींची पुढील पिढ्यांना माहिती व्हावी, त्याचा अभ्यास करता यावा म्हणून राज्य सरकारने इंदू मिलच्या १२ एकर जागेवर ४५० फूट उंचीचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार २०१५मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. शंभर फूट उंचीचा विस्तीर्ण चौथरा असून, त्याच्या मध्यभागी चैत्य हॉल, लायब्ररी, म्युझियम, विश्रांतिगृह अशा वेगवेगळ्या सुविधा असणार आहेत, तर त्यावर बाबासाहेबांचा ३५० फूट उंचीचा ब्रॉझचा पूर्णाकृती पुतळा असणार आहे. त्यापैकी स्मारकातील सहाय्यभूत इमारतींची संरचनात्मक कामे पूर्ण झाली आहेत. त्याचबरोबर अंतर्गत सजावट आणि बाह्य विकासाची कामे सुरू असल्याची माहिती ‘एमएमआरडीए’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पुतळ्याच्या पॅनेल कास्टिंगचे काम पूर्ण

शंभर फूट उंचीच्या स्मारक इमारतीच्या विस्तीर्ण चौथऱ्यावर ३५० फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कांस्य धातूचे आवरण असलेला पुतळा उभारला जाणार आहे. पुतळ्याच्या पायथ्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. पुतळ्याच्या आर्मेचर फॅब्रिकेशनचे काम सुरू असून, सहा हजार टन पोलाद लागणार आहे. त्यापैकी १,४०० टन पोलाद आले असून, ६५० टनांचे फॅब्रिकेशन पूर्ण झाले आहे. कांस्य धातूच्या आवरणाचे कामही सुरू असून, पुतळ्याच्या दोन्ही बुटांच्या पॅनेल कास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. त्यावरील शिलाई, लेस हुबेहूब दिसत आहे.

दृष्टिक्षेपातील स्मारक

- १२ एकर जागेत विस्तीर्ण स्मारक
- स्मारकाची उंची ४५० फूट, तर पुतळ्याची उंची ३५० फूट
- १,०८९ कोटी रुपये एकूण खर्च
- पुतळ्याचे वजन सहा हजार मेट्रिक टन
- पुतळ्यावरील ब्रॉझचे आवरण ८७० मेट्रिक टन
- ४७० वाहनांसाठी दुमजली बेसमेंट पार्किंग
Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : अवैध मुरुम उत्खनन दोषी अधिकाऱ्यांचीनंतरच बडतर्फी

 सोलापूरमधील चिंचोली एमआयडीसीमधील प्रकार  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आदेश  २०० कोटींच्या दंड

Raigad News : रायगड जिल्ह्यात नियम पूर्तता करणाऱ्या दगडखाणींना उत्खननाची परवानगी: महसूल मंत्री

मुंबई :  आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या खाणींना सरसकट बंदी न घालता उत्खननासाठी परवानगी द्यावी, मात्र

Deputy Collectors : राज्यातील ५१ तहसीलदार होणार उपजिल्हाधिकारी

महसूल विभागात हालचाली; 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हुकणार? मुंबई :

Mankhurd : मानखुर्द येथील सरकारी जमिनीवरील बाराशे अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा, तब्बल अकरा एकर जमीन अतिक्रमणमुक्त उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश

निष्कासित जागांवर विधायक उपक्रम, नागरिकांसाठी उभारणार अत्याधुनिक 'विज्ञानपार्क' मुंबई

ST Buses Tickets Rate : उन्हाळ्यात प्रवाशांना झटका; ST तिकिट दरात वाढ जाहीर

मुंबई : उन्हाळी सुट्टी सुरु झाली आहे आणि प्रत्येकजण आपल्या गावी किंवा बाहेरगावी जाण्यासाठी वेगवेगळ्या

BMC News : पाणी साचणाऱ्या ठिकाणांपासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले निर्देश मुंबईतील मिठी नदीसह नाल्यांची भिडे यांनी