गटशिक्षण अधिकाऱ्यांसह तीन अधिकारी निलंबित !

जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश


पालघर : शाळेत यायला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली. या प्रकारानंतर उठाबशा काढल्याने प्रकृती बिघडलेल्या एका विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना वसईत मागील महिन्यात घडली होती. या प्रकरणी तत्काळ वरिष्ठ कार्यालयात माहिती न देणे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यासोबतच, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी तीन अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये वसई तालुका गटशिक्षण अधिकारी, वसई शिक्षण विस्तार अधिकारी आणि वालिव केंद्र प्रमुख यांचा समावेश आहे.


सातिवली येथील श्री हनुमंत विद्या मंदिर या शाळेत शिकविणाऱ्या एका शिक्षिकेने उठाबशा काढण्याची शिक्षा काही विद्यार्थ्यांना दिली होती. त्यानंतर तब्येत खालावल्याने इयत्ता सहावी मध्ये शिकणाऱ्या काजल (अंशिका) गौड या मुलीचा मृत्यू उपचारादरम्यान झाला होता. या प्रकरणी वालिव पोलिसांनी संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करत अटक देखील केली होती. मात्र याच दरम्यान शाळेच्या इमारतीत अनधिकृतरित्या इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग भरत असल्याचे देखील शिक्षण विभागाला निदर्शनास आले आहे. तर शाळाच अनधिकृत जागेवर भरत असल्याची बाब देखील चौकशीमध्ये समोर आली होती.


दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून या शाळेत अनधिकृत वर्ग सुरु असल्याची आणि शाळा अनधिकृत जागेवर भरत असल्याबाबत तालुका शिक्षण विभागाने कोणतीही कारवाई केलेली नसल्याने शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी या सर्व प्रकरणाची दखल घेत वसई प्रभारी गटशिक्षण अधिकारी पांडुरंग गलांगे, वसईतील वालिव केंद्र प्रमुख कैलास चव्हाण आणि वसई पंचायत समिती विस्तार अधिकारी ( शिक्षण ) राजेंद्र उबाळे यांना निलंबित केले आहे.


शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण तात्काळ वरिष्ठ कार्यालयात न कळविणे, शाळा बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकारी नियमातील तरतुदीचे पालन न करणे असे कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या तीनही अधिकाऱ्यांवर लावण्यात आला आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील आणि समितीने केली आहे.

Comments
Add Comment

‘ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’कडे हस्तांतरित करू नये

उच्चाधिकार समितीचा निकाल सावंतवाडी : महाराष्ट्र आणि गोवा सीमेवर ‘ये-जा’ करणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’कडे

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’

चौलच्या पर्वतवासी श्री दत्तात्रेय देवस्थानच्या यात्रेला सुरुवात

सोमवारी, ८ डिसेंबरला पाच दिवसाच्या यात्रेचा होणार समारोप अलिबाग : चौलच्या पर्वतवासी श्रीदत्तात्रेय

औद्योगिक वसाहतींतील अंतर्गत रस्त्यांची चाळण

औद्योगिक वसाहतींतील अंतर्गत रस्त्यांची चाळण महाड  : रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत सर्वच

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा