मुंबई: जागतिक रेटिंग एजन्सी एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) वरील श्रेणीत (Ratings) मध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये ग्राहक-केंद्रित कंज्यूमर व्यवसायातील व्यवसायात वाढलेल्या रोख प्रवाह (Cash Flow) स्थिरता सुधारण्याची अपेक्षा असताना संस्थेने दीर्घकालीन श्रेणीत 'बीबीबी+' वरून 'ए-' अशी सुधारणा केली आहे. एस अँड पी ग्लोबलने नुकतीच ही घोषणा केली. यासह एजन्सीने स्थिर दृष्टीकोन देखील निश्चित केल्याचे रेटिंग एजन्सीने स्पष्ट केले आहे.
एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज त्यांच्या चक्रीय रोख प्रवाह वाढवत राहील. ज्यामुळे उत्पन्नाची गुणवत्ता मजबूत होईल असे निरिक्षण अहवालाने नोंदवले आहे इतकेच नाही तर त्यात म्हटले आहे की 'आम्ही रिलायन्स इंडस्ट्रीजवरील आमचे दीर्घकालीन क्रेडिट रेटिंग 'बीबीबी+' वरून 'ए-' केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कमी चक्रीय वाढीतील व्यवसायांमधून रोख प्रवाह वाढवत राहील ज्यामुळे त्यांची कमाईची गुणवत्ता सुधारेल.' असे म्हटले आहे.
रेटिंग एजन्सीने अधोरेखित केले की, कंपनीच्या विविध व्यवसायांमधील स्पर्धात्मक स्थितीमुळे उत्पन्न आणि रोख प्रवाह निर्मितीला आणखी चालना मिळेल, ज्यामुळे ती प्रमुख विभागांमधील मोठ्या गुंतवणुकीला पुरेसे कव्हर करू शकेल.
'स्थिर रेटिंग आउटलुक पाहता आमच्या मते प्रतिबिंबित रिलायन्स कंपनी त्याच्या प्रमुख व्यवसायांमध्ये आघाडीचे स्थान बाजारपेठेतील कायम ठेवेल आणि त्यांचे उत्पन्न पुढील १२-२४ महिन्यांत भांडवली खर्च कव्हर करण्यासाठी पुरेसे असेल असे रेटिंग एजन्सीने पुढे म्हटले आहे.
एस अँड पीने म्हटले आहे की डिजिटल सेवा आणि किरकोळ विक्रीसह अधिक स्थिर ग्राहक व्यवसायांमध्ये कंपनीच्या चालू विस्तारामुळे उत्पन्न आणि रोख प्रवाह स्थिरता वाढण्याची अपेक्षा आहे.डिजिटल सेवा विभागातून वाढत्या कमाईमुळे समूहाचे अधिक अस्थिर हायड्रोकार्बन व्यवसायावरील अवलंबित्व कमी होण्याची शक्यता आहे.
एजन्सीचा अंदाज आहे की डिजिटल सेवा आणि किरकोळ व्यवसाय एकत्रितपणे आर्थिक वर्ष २०२६ (३१ मार्च २०२६ रोजी संपणारे वर्ष) मध्ये ऑपरेटिंग कॅश फ्लोमध्ये जवळजवळ ६०% योगदान देतील, तर तेल-ते-रसायन (O2C) आणि तेल आणि वायू विभाग उर्वरित ४०% वाटा देतील. भारतातील दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजची मजबूत स्थिती पुढील दोन वर्षांत नफ्याला चालना देत राहील, असे त्यात पुढे नमूद केले आहे.
एजन्सीने म्हटले आहे की, कंपनीचे वायरलेस ग्राहक पुढील १२-२४ महिन्यांत ३-६% वाढू शकतात, ज्याला मर्यादित नेटवर्क गुंतवणुकीमुळे ग्राहकांचे नुकसान सहन करणाऱ्या इतर दूरसंचार कंपन्यांकडून ग्राहकांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होऊ शकते. दरम्यान, अधिकाधिक ग्राहक उच्च किमतीच्या (Consumers High Price) योजनांमध्ये अपग्रेड करत असल्याने आणि भारतात डेटा वापर वाढत असल्याने रिलायन्स जिओसाठी एआरपीयु (Average Revenue per User ARPU) वाढू शकतो. उल्लेखनीय म्हणजे, कंपनीने गेल्या दोनदा भारतात दरांमध्ये वाढ केली आहे.
S&P ग्लोबल रेटिंग्जने असेही म्हटले आहे की पुढील १२-२४ महिन्यांत कमाईची वाढ उच्च भांडवली खर्च (High Capital Expenditure Capex) पेक्षा जास्त असू शकते. त्यांच्या बेस केसनुसार, समूह आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत समायोजित कर्ज (Adjusted Loan) ते ईबीटा (EBITDA) गुणोत्तर (Ratio) १.५x-१.६x राखेल जे गेल्या दोन वर्षांत नोंदवलेल्या १.७x पेक्षा किंचित कमी आहे.
आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत कॅपेक्स सुमारे १.४ ट्रिलियन रुपयांवर राहू शकते, तर आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १.५ ट्रिलियन रुपयांच्या सर्वोच्च रोख भांडवली खर्चाच्या तुलनेत ओ२सी विस्तार, ५जी नेटवर्कची सतत तैनाती आणि विस्तार आणि किरकोळ दुकानांच्या पुढील अंमलबजावणीमुळे एजन्सीला सकारात्मक मुक्त ऑपरेटिंग रोख प्रवाह सुरू राहण्याची अपेक्षा आहे असे संस्थेने पुढे म्हटले.
एस अँड पीने कंपनीच्या मजबूत बॅलन्स शीट आणि त्याच्या ऊर्जा-संबंधित व्यवसायांमधून अमेरिकन डॉलरच्या महसुलात लक्षणीय एक्सपोजरचा हवाला देत रिलायन्स इंडस्ट्रीजवरील त्यांचे रेटिंग भारतावरील सार्वभौम रेटिंगपेक्षा दोन स्थानांनी वर असल्याचे अधोरेखित केले.पुढे पाहता, एस अँड पीने म्हटले आहे की स्थिर दृष्टीकोन रिलायन्स इंडस्ट्रीज त्यांचे मजबूत नेतृत्व कायम ठेवेल अशी अपेक्षा अधोरेखित करते.'