पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत सुविधेपासून वंचित आहेत. त्यांना या मुलभूत सुविधा देण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने आरे कॉलनी तसेच दिंडोशी वन क्षेत्रात राहणाऱ्या रहिवाश्यांना पंतप्रधान आवास योजनांच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभा नियम ३७७ अन्वये मागणी केली.


पंतप्रधान आवास योजने अतंर्गत राज्य तसेच संघ राज्य येथील सर्व पत्र लाभार्थी यांना मुलभूत सुविधांनी युक्त असलेली पक्की घरे बांधून देण्यासाठी केंद्र सरकार राज्य तसेच संघ राज्य यांना सर्वतोपरी मदत करीत आहे. या व्यतिरिक्त भारत सरकारने पंतप्रधान आवास योजना-शहर नव्या रुपात सुरु केली असून त्यानुसार या सुधारती पंतप्रधान आवास योजना-शहर २.० (पीएमएवाई-यु २.०) योजनेला १ सप्टेंबर २०२४ पासून सुरुवात झाली. या योजनेच्या माध्यमातून राज्य तसेच संघ राज्य क्षेत्र यांनी प्राधिकरणा मार्फत शहरी भागांसाठी गरीब, मध्यमवर्गातील कुटुंबांतील लाभार्थी यांच्यासाठी माफक दरात घरे (एएचपी) , माफक दरात घरे (एआरएच) तसेच व्याज सबसिडी योजनेच्या (आईएसएस) माध्यमातून योजनेसाठी मदत करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज जमा करण्यासाठी पीएमएवाई-२.० च्या संकेतस्थळावरून (https://pmay-urban.gov.in) करावे लागणार असल्याची माहिती, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी लेखी पत्राद्वारे खासदार वायकर यांना कळवले आहे.


तसेच राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणामार्फत पीएमएवाई-यु २.० मधील नियम व तरतुदीला अनुसरून योजना तयार करून राज्य सरकारच्या तसेच निरीक्षण समिती यांच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पुढील मंजुरीसाठी पाठवण्यात यावा, अशी सूचना हि केंद्रीय गृहनिर्माण तसेच शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी खासदार वायकर यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

Comments
Add Comment

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मेट्रो २ ‘ब’च्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा कायम

मुंबई : मेट्रो २ ब मार्गिकेतील मंडाले ते डायमंड गार्डन टप्प्याच्या संचलनासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे