पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून कांदा खरेदी करण्याची परवानगी दिली होती. मात्र, या प्रक्रियेत नाफेड, एनसीसीएफ, काही फार्मर प्रोड्युसर कंपन्या आणि व्यापाऱ्यांनी वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याविरोधात विश्वास माधवराव मोरे यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती तसेच मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने या कथित घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे विभागाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून अहवाल १६ जानेवारी २०२६ पर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.


केंद्र सरकारच्या योजनेत शेतकऱ्यांना अधिक दर मिळावा आणि ग्राहकांना कांदा योग्य दरात उपलब्ध व्हावा, यासाठी नाफेड आणि एनसीसीएफमार्फत फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून कांदा खरेदी करायची योजना आखण्यात आली होती तथापि, नाफेड आणि एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांनी काही व्यापारी, फेडरेशनचे सदस्य आणि चार्टर्ड अकाउंटंट यांच्याशी मिळून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी न करता, व्यापाऱ्यांकडून स्वस्त दरात घेतलेला कांदा शेतकऱ्यांचा कांदा दाखवला. या पद्धतीने स्वस्त दरातील कांदा वाढीव दराने केंद्राला विकून मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईकरांना दिलासा; पनवेल, मुंबई, नवी मुंबई, ठाणेला जोडणारा रस्ता होणार लवकरच पूर्ण

नवी मुंबई : उरण पूर्व भागाचा पनवेल, मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याशी थेट संपर्क साधणारा गव्हाणफाटा ते चिरनेर

Pune Cycle Tour : पुण्यात आंतरराष्ट्रीय सायकल टूरला अपघाताचे गालबोट; ५० हून अधिक सायकलस्वार एकमेकांवर धडकले अन्...

पुणे : जागतिक स्तरावर पुण्याचे नाव उंचावणाऱ्या 'बजाज पुणे ग्रँड सायकल टूर' या भव्य स्पर्धेला मंगळवारी एका भीषण

महाराष्ट्राच्या तरुणाने न्यूझीलंडमध्ये घोडेस्वारीची शर्यत जिंकली

पंढरपूर : कान्हापुरी (ता. पंढरपूर) येथील राहुल रघुनाथ भारती या तरुणाने न्युझीलंडमध्ये ‘हार्स रेसिंग स्पर्धेत’

टीईटी सक्तीतून जुन्या शिक्षकांना मिळणार मुक्ती?

न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारच्या हालचालींना वेग पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीमुळे देशभरातील

माथेरानमध्ये धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लूट

कदम दाम्पत्याला दोरीने बांधून चोरटे फरार माथेरान (वार्ताहर): पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये टी स्टॉलवर

Pune School Holiday: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 19 जानेवारीला शाळांना सुट्टी, मुख्य रस्ते बंद,ग्रँड टूरमुळे शहरात...

पुणे: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालयांना रजा देण्यात