'शक्ती'नंतर राणीबागेत 'रूद्र' वाघाचा मृत्यू! प्रशासनाच्या कारभारावर अनेक प्रश्न

मुंबई: मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून आणखी एका वाघाच्या बाबतीत धक्कादायक घटना समोर आली आहे. शक्ती नावाच्या वाघाच्या संशयास्पद मृत्यूनंतर आता रुद्र नावाचा आणखी एक वाघ बेपत्ता झाल्याचा दावा करण्यात आला होता. भाजपाचे दक्षिण मुंबई सरचिटणीस नितीन बनकर यांनी हा दावा केला आहे. यामुळे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दोन्ही प्रकरणांवरून प्रश्न पडतो तो, प्रशासन या गोष्टी स्वत:हून जाहीर का करत नाही. दरम्यान राणीच्या बागेत एकूण शक्ती, जय, करिश्मा आणि रुद्र असे चार वाघ होते. त्यापैकी शक्ती आणि रुद्र वाघाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता प्राणीसंग्रहालयात 'जय' (वय ३ वर्षे) आणि 'करिश्मा' (वय ११ वर्षे ६ महिने) हे दोन वाघ असल्याचे नमूद केले आहे.


राणीबागेतील शक्ती वाघाचा १७ नोव्हेंबरला मृत्यू झाला होता. परंतु, प्रशासनाने ही माहिती २६ नोव्हेंबरला समोर आणली. तब्बल आठ दिवसांनंतर ही माहिती समोर आल्यामुळे उद्यान प्रशासनावर संशय व्यक्त करण्यात येत होता. न्यूमोनिया बाधा झाल्यामुळे श्वसन प्रणाली सुरळीत नसल्याने शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता. याचप्रकरणी अधिक माहिती मिळवण्याकरिता आणि बागेतील रुद्र वाघ बेपत्ता झाल्यामुळे चौकशी करणारे पत्र भाजपाचे दक्षिण मुंबई सरचिटणीस नितीन बनकर यांनी उद्यान संचालकांना लिहिले होते. यानंतर पत्रातील प्रश्नांबाबत खुलासा करताना रुद्र वाघाचा मृत्यू २९ ऑक्टोबरला झाल्याची माहिती उघडकीस आली. रुद्र हा मृत शक्ती वाघ आणि करिष्मा वाघिणी यांचा बछडा असल्याचेही या पत्रातून उघडकीस आले आहे.



रुद्र बछड्याच्या आरोग्याबाबत प्रशासनाने सांगितले की, त्याला आईचे दूध कमी मिळाल्यामुळे त्याच्या संगोपनासाठी पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पथकाने लहानपणापासूनच मेहनत घेतलेली आहे. परंतु योग्य त्या काळात आईचे दूध न मिळाल्यामुळे त्याची प्रतिकार शक्ती ही कमजोराच होती. यामुळे तो आकाराने, वजनाने व आरोग्याच्या दृष्टीने जय वाघापेक्षा कमजोर होता. तसेच त्याला अनेकदा ट्रिपॅनोसोमा संसर्गाची लागण अनेकदा झाली होती. ज्याचा परिणाम त्याच्या दृष्टीवर झाल्याने त्याने दृष्टी गमावली होती. त्यात त्याला २१ ऑक्टोबरपासून श्वास घेण्यासाठी खूप त्रास होऊ लागल्यामुळे नेब्युलायझेशन नियमित देण्यात येत होते. मात्र २९ ऑक्टोबरला रात्री त्याने प्राण सोडला.


Comments
Add Comment

महापालिकेच्या मुलांना आता चॉकलेटस्वरुपातील एनर्जी बार

पोषक आहारांतर्गत खिचडीसह या एनर्जी बार दिले जाणार मुलांना एनर्जी बारसाठी १४१ कोटी रुपये खर्च केले जाणार

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार