मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची निवडणूक संचालन समिती जाहीर

मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. ज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाले असून मतमोजणी बाकी आहे. तर इतर दोन टप्प्यातील निवडणूकीसाठी सर्व पक्ष रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. दरम्यान तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपने मोठी घोषणा केली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ करिता भारतीय जनता पक्षाची मुंबई निवडणूक संचालन समिती घोषित केली आहे.


अमित साटम यांच्या अध्यक्षतेखाली जाहिर करण्यात आलेल्या निवडणूक संचालन समितीमध्ये पक्षातील अनेक आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ज्यात आशिष शेलार, अॅड. मंगलप्रभात लोढा, अॅड. राहुल नार्वेकर, प्रकाश मेहता, किरीट सोमैय्या, कालिदास कोळंबकर, मिहिर कोटेचा, पराग शाह, राम कदम, प्रसाद लाड, चित्रा वाघ या महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे. तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मिळून एकूण १४४ जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.



दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या मुंबई निवडणूक संचालन समितीमधील निमंत्रितांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

देवेंद्र फडणवीस ३.० ची यशोगाथा

महाराष्ट्रासाठी ‘गोल्डन इयर’ सुहास शेलार मुंबई : ५ डिसेंबर २०२४ चा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरला. हजारो

मोदी सरकारची मुंबईकरांसाठी खास भेट! नेरूळ-उरण-बेलापूर पट्ट्यात अतिरिक्त लोकल सेवा लवकरच होणार सुरू

नवी मुंबई: नेरूळ उरण रेल्वेमार्गावर उपनगरीय रेल्वे सेवेत वाढ व्हावी म्हणून मागील अनेक दिवसांपासून मागणी

'शक्ती'नंतर राणीबागेत 'रूद्र' वाघाचा मृत्यू! प्रशासनाच्या कारभारावर अनेक प्रश्न

मुंबई: मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून आणखी एका वाघाच्या बाबतीत धक्कादायक घटना

महापालिकेच्या मुलांना आता चॉकलेटस्वरुपातील एनर्जी बार

पोषक आहारांतर्गत खिचडीसह या एनर्जी बार दिले जाणार मुलांना एनर्जी बारसाठी १४१ कोटी रुपये खर्च केले जाणार

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित