मोहित सोमण: आरबीआयच्या पतधोरण समितीच्या निकालानंतर घसरलेला सेन्सेक्स व निफ्टी मोठ्या प्रमाणात उसळला असून बँक निर्देशांकातही वाढ झाली आहे. सकाळी ११.०४ वाजता सेन्सेक्स ३२८ अंकाने व निफ्टी १०१ अंकाने उसळला असून सेन्सेक्स बँक २१० अंकाने व बँक निफ्टी २७१ अंकाने उसळला आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर याचा मोठा फायदा शेअर बाजारात होताना दिसत आहे. कपात झाल्यानंतर आता रेपो दर ५.५०% वरून ५.२५% पोहोचल्याने बाजारात तरलता वाढीसह कर्जाचे हप्ते स्वस्त होण्याची आशा गुंतवणूकदारांनी केली. परिणामी बँक निर्देशांकासह विशेषतः मोठ्या बँकेच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात उसळी घेतली गेली.एचडीएफसी बँक (०.९६%), आयसीआयसीआय बँक (०.२६%), एसबीआय (०.९५%), कोटक महिंद्रा बँक (०.३६%), बँक ऑफ बडोदा (०.४०%), पीएनबी (१.३९%), कॅनरा बँक (०.४५%), युनियन बँक ऑफ इंडिया (०.०५%), आयडीबीआय बँक (०.०२%), एयु स्मॉल फायनान्स बँक (१.०७%) शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली. केवळ अँक्सिस बँक (०.७२%), इंडियन ओव्हरसिज बँक (०.३४%) घसरण कायम राहिली.
तरलतेविषयी भाष्य करताना इंडियाबाँड.कॉम चे सह संस्थापक विशाल गोयंका म्हणाले आहेत की,'आरबीआय एमपीसी घोषणेवर भाष्य करताना, इंडियाबॉन्ड्स डॉट कॉमचे सह-संस्थापक विशाल गोएंका म्हणाले,'अलीकडील महागाईचे प्रमाण आणि बँकिंग क्षेत्रात कमी व्याजदरांचे प्रसारण न झाल्यामुळे, आरबीआयने रेपो दरात २५ बेसिस पॉइंटने कपात केली आहे. मनोरंजक म्हणजे, महागाईच्या अपेक्षा खूपच कमी झाल्या आहेत, ज्यामुळे आर्थिक वर्षाच्या अखेरीस आवश्यकता भासल्यास पुन्हा दर कपात करण्याचे दार उघडले आहे. सरकार आणि कॉर्पोरेट्ससाठी निधी स्वस्त करणे हा यामागील हेतू आहे आणि १ लाख कोटी रुपयांच्या ओएमओ खरेदीच्या घोषणेमुळे तरलता वाढविण्यास आणि उत्पन्न वक्र सपाट करण्यास मदत होईल. यानंतर, गुंतवणूकदारांनी २-३ वर्षांच्या सेगमेंटमधील कॉर्पोरेट्सकडून सध्याच्या उच्च दरांमध्ये लॉक करण्याचा विचार करावा आणि संभाव्य नफ्यासाठी दीर्घकालीन सरकारी बाँड खरेदी करून याला पूरक ठरावे.'
गेल्या तीन दिवसात पतधोरण समितीच्या बैठकीपूर्वी बँकेच्या शेअर्समध्ये बाजारातील नफा बुकिंग सुरू होता. सावधगिरी बाळगल्याने शेअरमधील विक्रीही मोठ्या प्रमाणात थांबली होती. अर्थात परवा सरकारने एफडीआय पीएसयु बँकेत आणण्याचा कुठलाही विचार नसल्याचे स्पष्ट केल्याने बाजारात बँक शेअर्समध्ये मोठा फटका बसला असला तरी एका सत्रात बँकांनी हा तोटा नव्याने उसळत नफ्यात बदलला आहे. केवळ बँक नाही तर विना बँकिंग वित्तीय संस्था (Non Banking Financial Institution NBFCs) शेअर ३% पातळी पर्यंत उसळले आहेत. बजाज फायनान्स (२.८१%), जियो फायनांशियल सर्विसेस (०.२३%), श्रीराम फायनान्स (२.३१%), मुथुट फायनान्स (१.३३%), चोलामंडलम फायनान्स (१.७४%), टाटा कॅपिटल (१.७६%), आदित्य बिर्ला कॅपिटल (२.८१%), एसबीआय कार्ड (२.४४%), सुंदरम फायनान्स (३.८८%), एचडीबी फायनांशियल सर्विसेस (०.५६%), महिंद्रा अँड महिंद्रा फिनसर्व्ह (५.५६%) शेअर्समध्ये वाढ झाली असून केवळ बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेसमेंट (०.६२%) मध्ये किरकोळ घसरण झाली.
आरबीआयच्या निर्णयानंतर बँकेच्या क्रेडिट ग्रोथ (वाढ) अपेक्षित असल्याने मोठ्या प्रमाणात कर्जाच्या मागणीत वाढ होऊ शकते. अर्थात याचा फायदा ग्राहकांना झाल्यास वैयक्तिक उपभोगात (Personal Consumption) व खर्चाचे बजेट वाढल्यास त्याचा परिणाम व्यापारावर अपेक्षित आहे. याच कारणामुळे शेअर आज मोठ्या प्रमाणात उसळले आहेत.