रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या आगामी चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टिझरमध्ये ‘बाई अडलीये म्हणून नडलीये’ ही प्रभावी टॅगलाईन आणि सायकलवरून गावागावांत फिरणाऱ्या आरोग्य सेविकेची झलक दाखवत चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधले होते. टिझरमधील वास्तववादी दृश्यांमुळे प्रेक्षकांच्या मनात आशाच्या प्रवासाबद्दल वेगळे कुतूहल निर्माण झाले.


या कुतूहलाला उधाण आले ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चालत रहा पुढे’ या प्रेरणादायी गाण्यामुळे. आशाच्या संघर्षाला बळ देणारे हे गीत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, प्रेक्षकांनी तिच्या जिद्दीचे आणि धैर्याचे कौतुक केले आहे. यानंतर प्रदर्शित झालेला दमदार ट्रेलर तर प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढवणारा ठरला आहे.


चित्रपटाचा ट्रेलर लाँच आयुष्यमान भारत – मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, ज्येष्ठ साहित्यिक व ९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, लोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू मंगलप्रभात लोढा आणि आशा सेविका यांच्या उपस्थितीत पार पडला.


‘आशा’ हा महिलांच्या संघर्षाचा वास्तववादी प्रवास मांडणारा चित्रपट आहे. ट्रेलरमध्ये रिंकूने साकारलेली आशा गावोगावी आरोग्याची जबाबदारी पेलताना, कुटुंबातील ताणतणावांचा सामना करताना, अन्यायासमोर ठामपणे उभी राहताना दिसते. तिच्या आयुष्यातील वेदना, तळमळ आणि न थकणारी धडपड ट्रेलरमधून स्पष्टपणे जाणवते.


रिंकूसोबत सयंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते या कलाकारांनी चित्रपटाला अधिक बळ दिले आहे. महिलांच्या आयुष्यातील कठोर निर्णय, सामाजिक वास्तव, भावनिक दडपण आणि अस्मितेची सतत सुरू असलेली लढाई या सर्वांचा प्रभावी संगम चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘आशा’ ही कथा एका सेविकेपुरती मर्यादित नसून दररोज जीवनाशी दोन हात करणाऱ्या लाखो महिलांची कहाणी आहे.


दीपक पाटील दिग्दर्शित ‘आशा’चे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दीपक पाटील असून मुरलीधर चटवानी आणि रवींद्र औटी सहनिर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडिओज या बॅनरखाली प्रदर्शित होणारा हा चित्रपट १९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. टिझर, गाणे आणि ट्रेलरमुळे ‘आशा’विषयीची उत्सुकता सध्या उच्चांक गाठत आहे.

Comments
Add Comment

प्राजक्तानं नंदीवरुन घेतलेली एन्ट्री योग्य की अयोग्य ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

मुंबई : नुकताच स्वराज्यरक्षक संभाजी फेम येसूबाई म्हणजेच प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा विवाह सोहळा झाला.

रीलस्टार जोडपं निघाले सराईत चोर! आयफोन 17 प्रो मॅक्स, साडे सहा तोळे सोन्याचे दागिने आणि लाखो रुपये...

अहिल्यानगर: जिल्हा पोलिस दलाने बसमधून महिलांच्या पर्स चोरी करणाऱ्या एका सराईत जोडप्याला जेरबंद केले आहे. या

‘व्ही. शांताराम’ यांचे जीवन मेगा बायोपिकच्या रूपात

भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे

हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!

मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्या-फुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी

महिला दिनी उलगडणार ‘तिघीं’च्या आयुष्यातलं ‘चौथं पान’!

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा हृदयस्पर्शी आणि नात्यांच्या उबदार धाग्यांनी

आमिर खान प्रोडक्शन्सची सरप्राईज भेट! वीर दासचा ‘हॅपी पटेल’ १६ जानेवारी २०२६ ला प्रेक्षकांसमोर

‘हॅपी पटेल’चा धमाकेदार खुलासा! वीर दास आणि मोना सिंगची गुप्तहेर कथा १६ जानेवारी २०२६ रोजी रिलीज आमिर खानचा नवीन