कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. कारण या विमानतळवरील दुसऱ्या धावपट्टीच्या बांधकामात एक मशिद अडथळा ठरत आहे.एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) ने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे.
कोलकाता विमानतळावरील वाढत्या उड्डाणसंख्येच्या पार्श्वभूमीवर दुसरी धावपट्टी तयार करणे अत्यंत गरजेचे असल्याने विमानतळाचे आधुनिकीकरण आणि विस्ताराचे काम सुरू आहे. यामुळे प्रवाशांची क्षमता दुप्पटीने वाढणार आहे. मात्र अडथळा ठरत असलेली मशिद हटवण्याबाबत एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला राज्य सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
नवी मुंबई: पनवेल पूर्व रेल्वे स्टेशन परिसरात एक फॉर्च्युनर कार संशयास्पदरित्या आढळून आल्याचे दिसले. महत्त्वाचे म्हणजे या कारमध्ये पिस्तुल असल्याचा ...
दरम्यान,आता भाजपनेही या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी यांच्या सरकारला घेरले आहे. भाजप प्रवक्ते अमित मालवीय यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, "कोलकाता विमानतळाच्या धावपट्टी परिसरात असलेल्या मशिदीबद्दल भाजप बंगाल प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी राज्यसभेत एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला होता. नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, दुसऱ्या धावपट्टीवर असलेली एक मशिद प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अडथळा निर्माण करत आहे. धावपट्टीचा थ्रेशहोल्ड ८८ मीटरने सरकला आहे. यामुळे पहिली धावपट्टी उपलब्ध नसताना दुसऱ्या धावपट्टीच्या वापरावर परिणाम होतो. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत राजकारण करू नये. हे ममता बॅनर्जि यांनी समजून घेतले पाहिजे."
तसेच अमित मालवीय यांनी ममता सरकारवर धार्मिक भावना या राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रवाशांच्या जीवापेक्षा महत्त्वाच्या ठरत आहेत आणि हे एक बेजबाबदारपणाचं लक्षण आहे, असा आरोप केला आहे. दरम्यान बांधकाम हटवणं मशिदीच्या कमिटीला योग्य वाटत नसल्याने त्यांनी या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला असून मशिदीला विमानतळ परिसराच्या बाहेर किंवा अन्य कोणत्या ठिकाणी हलवण्याबाबत सहमती दर्शवत नाही आहेत.