मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित सैनी यांची अखेर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी सनदी अधिकारी अविनाश ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ अमित सैनी हे अभियंत्यांच्या बढती आणि बदलीमुळे वादात अडकले होते आणि त्यांनी केलेल्या बदली तथा बढतींना स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे सैनी यांची बदलीची जोरदार हवा असतानाच आता त्यांच्या जागी अविनाश ढाकणे यांची वर्णी लावण्यात आली आहे.


मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीची सेवा पूर्ण केल्याने महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे)आश्विनी भिडे यांची बदली झाल्यानंतर १९ मार्च २०२४ रोजी त्यांच्या रिक्त जागी डॉ अमित सैनी यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुरुवातील काही महिने महापालिकेत मन न रमलेल्या सैनी यांनी बदलीसाठी प्रारंभी बराच प्रयत्न केला होता. परंतु त्यानंतर बदलीची शक्यता नसल्याने त्यांनी अखेर महापालिकेच्या कामकाजात लक्ष घालण्यास सुरुवात केली. सैनी यांच्याकडे पूर्व उपनगरे विभागाचा पदभार होता आणि त्यांच्या प्रमाेशन कमिटी, नगर अभियंता, उद्यान, राणीबाग तसेच कोस्टल रोड आदींचा पदभार होता. मागील काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी मंजुरी दिलेल्या १२२ तसेच ३४ अभियंत्यांच्या बदलीबाबत अनियमितता झाल्याची बाब लक्षात येऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बदली आदेशाला स्थगिती देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले. त्यानुसार महापालिकेतील १५६ अभियंत्यांच्या बदलीला आयुक्तांनी स्थगिती दिली होती. या प्रकरणावरून सैनी हे वादात अडकले होते.


परंतु आता सैनी यांच्या जागेवर अतिरिक्त आयुक्त म्हणून अविनाश ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अविनाश ढाकणे हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडाळाचे सदस्य सचिव पदावर कार्यरत होते आर्णि समुद्रात मूर्ती विसर्जनासाठी त्यांनी मानक कार्यपध्दती तयार केली होती. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती समुद्रात विसर्जन करु नये यासाठी त्यांनी मंडळाच्या माध्यमातून महत्वपूर्ण भूमिका बजावण्याचे काम केले होते.

Comments
Add Comment

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त

MHT-CET Exam : 'एमएचटी-सीईटी' परीक्षेत कोणताही घोटाळा नाही; आयुक्त दिलीप सरदेसाई

आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल https://prahaar.in/2026/07/28/cwg-2026-indias-dominance-in-weightlifting-continues-manipurs-bindyarani-wins-a-medal-for-the-second-consecutive-time/ मुंबई : 'नीट'

Seven Hills Hospital : सेव्हन हिल्स रुग्णालयाचा प्रस्ताव पुन्हा एकदा सुधार समितीपुढे

- मंजूर झाल्यास १५०० खाटांच्या तुलनेत ३०० खाटा मिळणार महापालिका रुग्णांसाठी - सुधार समिती यावर काय निर्णय घेते

Kurla LBS Junction Waterlogging : कुर्ला एलबीएस जंक्शनवरील तुंबणाऱ्या पाण्याची समस्या मिटणार

- पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचा आकार वाढवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कुर्ला काळे मार्ग तसेच सोनापूर

Grant Road Skywalk : ग्रँटरोड नाना चौकातील स्कायवॉकवर पुन्हा सरकत प्रवास

- दोन्ही बंद सरकत्या जिन्यांच्या जागी नव्याने स्थापना मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ग्रँटरोडवरील नाना चौकातील

Devendra Fadnavis : नैना क्षेत्रातील नगर रचना योजनांमधील त्रुटी दूर करून ग्रामस्थांना मालमत्ता पत्रक वाटप करावे - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : नवी मुंबईतील नैना (नवी मुंबई एअरपोर्ट इंफ्लूएन्स नोटीफाईड एरिया) क्षेत्रातील गावांच्या नगर रचना