MHT-CET Exam : 'एमएचटी-सीईटी' परीक्षेत कोणताही घोटाळा नाही; आयुक्त दिलीप सरदेसाई

आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल



मुंबई : 'नीट' परीक्षेतील अनियमिततेचा वाद ताजा असतानाच, राज्यातील 'एमएचटी-सीईटी' परीक्षेतही महाघोटाळा झाल्याचे दावे विरोधकांकडून केले जात आहेत. मात्र, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "सीईटी परीक्षेत कोणताही घोटाळा झालेला नसून सोशल मीडियावर केले जाणारे दावे दिशाभूल करणारे आणि तथ्यहीन आहेत," असे स्पष्टीकरण सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिले आहे. तसेच याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून पोलीस व सायबर विभागाकडे सखोल चौकशीची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.



राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) पदाधिकारी महादेव बालगुडे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एका शिक्षकाचा व्हिडिओ शेअर करत एमएचटी-सीईटी २०२६ मध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. या व्हिडिओमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर सीईटी सेलकडून अधिकृत भूमिका मांडण्यात आली.



"काही विद्यार्थी बारावी बोर्डाच्या परीक्षेपेक्षा सीईटी परीक्षेला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांना बोर्डाच्या तुलनेत सीईटीत जास्त गुण मिळतात. दोन वेगवेगळ्या परीक्षांच्या कामगिरीची एकमेकांशी तुलना करणे अयोग्य आहे," असे स्पष्टीकरण आयुक्त सरदेसाई यांनी दिले. टक्केवारी (पर्सेंटेज) आणि पर्सेंटाईल या दोन पूर्णपणे भिन्न पद्धती आहेत. पर्सेंटाईल पद्धत ही संबंधित बॅचपुरती मर्यादित असते. त्या बॅचमध्ये जो सर्वाधिक गुण मिळवतो, तो 'टॉपर' ठरतो आणि त्याला १०० पर्सेंटाईल दिले जातात. मग त्याचा मूळ स्कोअर (रॉ स्कोअर) ७०, ८० किंवा ९० काहीही असो. १०० पर्सेंटाईलचा अर्थ १०० टक्के गुण असा होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.



अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध तक्रार


एमएचटी-सीईटी परीक्षेतील कथित अनियमिततेबाबत प्राप्त झालेल्या सर्व आक्षेपांचे अंतर्गत विश्लेषण केले जाणार असून त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध आणि चुकीची माहिती देणाऱ्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून सायबर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे जिओच्या अधिकाऱ्यांना निर्देश

नव्या टॉवर्ससह सेवा सक्षम करण्यावर

Nitesh Rane : देवगडच्या आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला गती मिळणार, प्रस्तावित कामांच्या नियोजनाचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना गती देताना स्थानिक

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसानभरपाई धोरणाचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून मंत्रालय स्तरावर सर्वंकष आढावा

मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा नव्याने विचार; TISS अहवालानंतर निर्णय घेणार ; मंत्री नितेश राणे मुंबई :

Nitesh Rane : पनवेल येथे सिल्ला मत्स्यालय व सी लायन मनोरंजन केंद्र उभारणीला गती द्या; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा महत्त्वाकांक्षी

Ashish Shelar : मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारला एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार; चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासह सर्व घटकांवर ३१ मार्च २०२७ पर्यंत ५० टक्के

Jaykumar Rawal and Shambhuraj Desai : आग्रा येथील शिवपराक्रम नव्या पिढीपर्यंत; १७ ऑगस्ट ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा होणार

आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार -राजशिष्टाचार