Seven Hills Hospital : सेव्हन हिल्स रुग्णालयाचा प्रस्ताव पुन्हा एकदा सुधार समितीपुढे

- मंजूर झाल्यास १५०० खाटांच्या तुलनेत ३०० खाटा मिळणार महापालिका रुग्णांसाठी


- सुधार समिती यावर काय निर्णय घेते यावर सर्वांचे लक्ष


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने खासगी सहभाग तत्वावर देण्यात आलेले मरोळ येथील रुग्णालय सेव्हनहिल्स व्यवस्थापनाबाबत यापूर्वी केलेला करार आणि सामजंस्य करार आता संपुष्टात आणून नव्याने २०१३मधील अटी व शर्तींच्या अधीन राहून महापालिका व सेव्हन हिल्स हेल्थकेअर व क्रॅप्री ग्लोबल कंपनी याच्यामध्ये नव्याने निवाडा करार करण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्ताव आता पुन्हा एकदा सुधार समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या नवीन करारामुळे १५०० खाटांचे रुग्णालय सुरु केले जाणार आहे, त्यातील ३०० खाटा या महापालिका रुग्णांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे सुधार समिती हा प्रस्ताव मंजूर करून खासगी संस्थेच्या माध्यमातून ३०० खाटा उपलब्ध करून घेते की हे प्रस्ताव न मंजुर करता ते बंद करायला लावते याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Seven Hills Hospital)


अंधेरी पूर्व मरोळ येथील सर्वे क्रमांक १५५ भाग, १५६ भाग १६२ भाग ते १६८ धारण करणाऱ्या महापालिकेचा भूभागावरील रुग्णालय सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर महापालिकेच्या ७७०५५ चौरस मीटर पैंकी ६६,६८७ चौरस मीटर भूभाग त्यावरील इमारती यांच्यसह सेव्हन हिल्स हॉस्पिटल्स लिमिटेड व सोमा इंटरप्रायझेस या संयुक्त कंपनीला रुग्णालय चालवण्यासाठी जसे आहे जेथे आहे तत्वावर प्रथम ३० वर्षांकरता आणि नुतनीकरण करता येईल अशाप्रकारे पुढील ३० वर्षांकरता खासगी सहभाग तत्वावर देण्याचा निर्णय २००४मध्ये घेण्यात आला होता. त्यानंतर सेव्हनहिल्स हॉस्पिटल्स सोबत २००५मध्ये कंत्राट करार आणि सन २०१३मध्ये सामजस्य करार करण्यात आला होता. या कराराचे उल्लंघन झाल्यानंतर २४ जानेवारी २०१८मध्ये कराराचे उल्लंघन झाल्याने त्यांचे करार संपुष्टात आणण्यासाठी महापालिकेच्यावतीने कारणे दाखवा नोटीस बजावली. तत्पूर्वी सन २०१७मध्ये ही कंपनी दिवाळीखोरीत गेली होती. त्यामुळे महापालिकेला दंडात्मक कारवाई करणे शक्य नव्हते. त्यामुळे २०१९मध्ये सवोच्च न्यायालयाच्या निकालानुसार महापालिकेच्या मान्यतेशिवाय कोणताही रिज्युलेशन करता येणार नाही असे नमुद केले होते. त्यामुळे सन २०२०मध्ये कोविड काळात महापालिकेने हे रुग्णालय कोविडच्या आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरात आणले. त्यामुळे खर्चाची प्रतिपूर्ती करत महापालिकेने स्वत: देखरेख ठेवत हे रुग्णालय चालवले. (Seven Hills Hospital)



दरम्यान २०२४-२५मध्ये लवादाने दिलेल्या निर्णयानुसार पीपीपीवर वर हे रुग्णालय देण्यासाठी स्वारस्य अर्ज मागवले. यामध्ये ज्युपिटल कंपनी आणि कॅप्री ग्रोबल होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये ज्युपिटल कंपनीने महापालिकेचे देणे माफ करण्याची विनंती केली. पण रिलायन्स कंपनी संलग्न असलेल्या क्रॅप्री ग्रोबल कंपनीने २०२० पर्यंतचे ७२ कोटी रुपये देणे, सन २०२६पर्यंतचा मालमत्ता कराचे देणे असलेली ११२ कोटी रुपये, जकात करापोटी १ कोटी रुपये तसेच देखभालीवरील ३९ कोटी अशाप्रकारे एकूण २२३.४ कोटी रुपयांपैंकी १८३ कोटी रुपये महापालिकेला अदा केले आहे. त्यामुळे महापालिका सुधार समिती व महापालिका सभागृहात सन २००५चा ठराव यापूर्वी रद्द करण्यात आला होतो, तो नंतर पुनर्जिवित करण्यात आला. त्यामुळे या पुनर्जिवित करण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये सुधारणा करणे आणि भाडेकरार ३० वर्षांचा करण्याचा सुधारीत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे सामजंस्य करार २०१३मधील अटी व शर्तींच्या अधीन राहून महापालिका व सेव्हन हिल्स हेल्थकेअर व क्रॅप्री ग्लोबल कंपनी याच्यामध्ये नव्याने निवाडा करार करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव यापूर्वी सुधार समितीने विविध प्रश्न उपस्थित करत फेरविचारासाठी परत पाठवले होते. (Seven Hills Hospital)



यामध्ये येथील जमिन आणि रुग्णालयाचा ताबा सेव्हन हिल्स हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे यांच्याकडे आहे. . कॅप्री ग्लोबल होल्डींग्ज प्रायव्हेट लिमिटेड यांचा अंतिम रिझोल्यूशन प्लॅन एनसीएलटी अमरावती बेंच प्राधिकरणाने मंजूर केला असून एसएचपीएल यांची सीआयआरपी पूर्ण झाली असल्याने त्यांच्या समवेत मक्ता करार करावयाच्या असून त्याला सुधार समिती व महापालिका यांची मंजुरी मिळावी अशी आरोग्य विभागाने नमुद करत हा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव आता सुधार समिती मंजूर करते की पुन्हा फेरविचारासाठी पाठवते याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Seven Hills Hospital)

Comments
Add Comment

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे जिओच्या अधिकाऱ्यांना निर्देश

नव्या टॉवर्ससह सेवा सक्षम करण्यावर

Nitesh Rane : देवगडच्या आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला गती मिळणार, प्रस्तावित कामांच्या नियोजनाचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना गती देताना स्थानिक

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसानभरपाई धोरणाचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून मंत्रालय स्तरावर सर्वंकष आढावा

मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा नव्याने विचार; TISS अहवालानंतर निर्णय घेणार ; मंत्री नितेश राणे मुंबई :

Nitesh Rane : पनवेल येथे सिल्ला मत्स्यालय व सी लायन मनोरंजन केंद्र उभारणीला गती द्या; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा महत्त्वाकांक्षी

Ashish Shelar : मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारला एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार; चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासह सर्व घटकांवर ३१ मार्च २०२७ पर्यंत ५० टक्के

Jaykumar Rawal and Shambhuraj Desai : आग्रा येथील शिवपराक्रम नव्या पिढीपर्यंत; १७ ऑगस्ट ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा होणार

आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार -राजशिष्टाचार