मोहित सोमण: सोन्यातील विशेषतः एकूणच कमोडिटीतील अस्थिरता मोठ्या प्रमाणात वाढल्याने दोन विरुद्ध दिशेने कमोडिटी प्रवास करत आहे. दोन दिवस सलग वाढलेले सोने घसरलेला रूपया, व युएस बाजारातील घरसलेली पेरोल कामगार रोजगार आकडेवारी, फेड व्याजदरात कपातीविषयी संभ्रम या कारणामुळे सोन्यावर आंतरराष्ट्रीय दबाव पडला व अंतिमतः सोन्यात आज घसरण झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २२ रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २० रूपयांनी घसरण झाली आहे तर १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १६ रूपयांनी घसरण झाली. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी आज १३०३६, २२ कॅरेटसाठी ११९५०, १८ कॅरेटसाठी ९७७८ रूपयांवर पोहोचले आहेत. २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात २२० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत २०० रुपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १६० रूपयांनी घसरण झाली. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १३०३६० रूपये, २२ कॅरेटसाठी ११९५०० रूपये, १८ कॅरेटसाठी ९७७८० रूपयांवर गेले आहेत.
आकडेवारीनुसार, भारतीय सराफा बाजारात मुंबईसह इतर महत्वाच्या शहरात सोन्याचा प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १३०३६ रूपये, २२ कॅरेटसाठी १२०२० रूपये, १८ कॅरेटसाठी १००२५ रूपयावर पोहोचला आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये विचार केल्यास दुपारपर्यंत सोन्याचा निर्देशांकात ०.४९% घसरून १२९८१७ रूपयांवर पोहोचला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोन्याचे वायदे प्रति १० ग्रॅम ८८ किंवा ०.०७% घसरून १३०३७४ पर्यंत घसरले आणि १३१२२ लॉटचा व्यवसाय दुपारपर्यंत झाला आहे.
जागतिक बाजारातील गोल्ड फ्युचर निर्देशांकात दुपारपर्यंत ०.३०% घसरण झाली असून जागतिक मानक (World Standard Rate) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात दुपारपर्यंत ०.३२% घसरण झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ४१९०.२० रुपयांवर पोहोचली आहे. काल संध्याकाळपर्यंत डॉलर निर्देशांकात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने सोन्याला आधारभूत पातळी गाठता आली ज्या कारणाने सोने आणखी महागले होते. आज मात्र जागतिक पातळीवरील डॉलर निर्देशांकात (Dollar Index DXY) सुधारणा झाल्याने सोन्याच्या दरातील दबाव कमी होत सोने स्वस्त झाले. दुपारपर्यंत डॉलर निर्देशांक ०.१४% उसळत प्रति डॉलर ९८.९९ (रूपये) दराने सुरु आहे. गेल्या आठवड्यात सोने सहा आठवड्यातील सर्वाधिक पातळीवर म्हणजेच ४२६४ डॉलर प्रति औंसवर झाले होते. त्यानंतर बाजारात मार्केट करेक्शन झाल्याने सोने स्वस्त होऊन पुन्हा महागले होते आज मात्र डॉलर दरपातळी वाढल्याने सोने किरकोळ दरात स्वस्त झाले आहे.
युएस बाजारातील फेड दरात कपातीची संभावना २५ बेसिस पूर्णांकाने वाढल्याने बाजारात आश्वासकता कायम आहे. तर भारतीय बाजारातील रेपो दरात कपात अपेक्षित असल्याने रूपया घसरला असला तरी डॉलरमध्ये झालेल्या वाढीमुळे भारतीय बाजारातही काही प्रमाणात सोन्यात दिलासा मिळाला आहे. अमेरिकेतील नवीनतम आकडेवारीमुळे दर कपातीकडे असलेल्या भावनांना आणखी बळकटी मिळाली आहे. एडीपी रोजगार अहवालानुसार नोव्हेंबरमध्ये खाजगी वेतनात ३२००० ने घट झाली असून ऑक्टोबरच्या ४७००० रोजगार वाढीच्या तुलनेत ही मोठी घट समजली जाते. गुंतवणूकदार आता सप्टेंबरमध्ये उशीरा येणाऱ्या वैयक्तिक खर्च (Personal Consumption Expenditure) किंमत निर्देशांक (Price Consumption Expenditure PCE) कडून अधिक निश्चित संकेताची वाट पाहत आहेत जो शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे. दर कपात किती आक्रमक असू शकते हे अधिक चांगल्या प्रकारे शुक्रवारी आलेल्या आकडेवारीवर निश्चित केले जाईल. चांदीच्या दरात मात्र आज कुठलाही बदल झालेला नाही.
आज बुधवारी सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम १३०३७४ पर्यंत घसरले तर चांदीचे वायदे (Future) प्रति किलोग्रॅम १८२६७२ पर्यंत वाढले कारण जागतिक मिश्र ट्रेंड आणि घसरलेल्या युएस अहवालातील आर्थिक आकडेवारीमुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली आहे. तथापि, मार्च २०२६ साठी चांदीचे वायदे १३८२० लॉटमध्ये ३२० किंवा ०.१८% वाढून १८२६७२ प्रति किलोग्रॅम दरावर पोहोचले आहेत.
आजच्या सोन्यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना, 'सोन्याचे दिवसाच्या नीचांकी पातळीपासून पुनरागमन होऊनही तो दिवसाच्या आत तीव्र अस्थिरतेसह व्यवहार करत होता परंतु तोटा टिकवून ठेवण्यात अपयशी ठरला' असे मेहता इक्विटीज लिमिटेडचे कमोडिटीजचे उपाध्यक्ष राहुल कलंत्री म्हणाले आहेत.