Kia India November Sales: नोव्हेंबरमध्ये किया इंडियाची विक्रीत २४% विक्रमी वाढ

मोहित सोमण: किया इंडिया या देशातील मास स्केल मिड प्रिमियम कारमेकरने भारतातील बाजारपेठेत प्रवेश केल्‍यापासून नोव्‍हेंबरमध्‍ये आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च विक्रीची नोंद केली आहे. २५४८९ युनिट्सची विक्री करत कंपनीने नोव्‍हेंबर २०२४ मध्‍ये विक्री करण्‍यात आलेल्‍या २०६०० युनिट्सच्‍या तुलनेत इयर ऑन इयर बेसिसवर २४% मोठी वाढ संपादित केली आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की,' या कामगिरीचे श्रेय ऑक्‍टोबर २०२५ मध्‍ये कियाने केलेल्‍या आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च विक्रीला जाते ज्‍यासह ब्रँडची स्थिर विकास गती अधिक प्रबळ होत आहे.'


कंपनीच्या मते एकूणच ग्राहकांमध्‍ये कियाच्‍या पोर्टफोलिओसाठी मोठ्या मागणीसह वर्षभर ब्रँडची विक्रीतील स्थिर गती दिसून येते. सणासुदीच्‍या काळानंतर देखील मोठी मागणी आणि प्रबळ रिटेल परिसंस्‍थेच्‍या पाठिंब्‍यासह किया इंडियाची वायटीडी देशांतर्गत विक्री गेल्‍या वर्षीच्‍या २३६०४३ युनिट्सच्‍या तुलनेत २६१६२७ युनिट्सपर्यंत वाढली आहे. स्पर्धेत्मक वातावरण कायम असताना देखील किया सोनेटला लोकप्रियता मिळाली असे कंपनीने म्हटले. या कारने गेल्‍या नोव्‍हेंबरच्‍या तुलनेत ३०% पेक्षा अधिक वाढीची नोंदवली होती.


नुकतेच जीएसटी दरामध्‍ये करण्‍यात आलेल्‍या सुधारणांनी सोनेटसाठी मागणी अधिक वाढवली आहे असे कंपनीच्या वरिष्ठांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. अलीकडील महिन्‍यांमध्‍ये ब्रँडची कामगिरी आणखी सुधारल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. दरम्‍यान इतर सेल्‍टोस, सिरॉस, कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस आणि कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍ही यांना देखील बाजारपेठेत सकारात्‍मक प्रतिसाद मिळाला.


या यशाबाबत प्रसारमाध्यमांशी मत व्‍यक्‍त करताना किया इंडियाच्‍या सेल्‍स अँड मार्केटिंगचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष अतुल सूद म्‍हणाले आहेत की,'नोव्‍हेंबरमध्‍ये करण्‍यात आलेल्‍या आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च कामगिरीमधून भारतातील ग्राहकांमध्‍ये कियाप्रती वाढती लोकप्रियता दिसून येते. सणासुदीच्‍या काळात बाजारपेठेत मागणीला गती मिळण्‍यासोबत आमच्‍या उत्‍पादनांना प्राधान्‍य दिले जात असल्‍याचे देखील दिसून आले.सहाय्यक धोरण आणि गतीशीलता पायाभूत सुविधेमध्‍ये त्‍वरित सुधारणा श्रेणींमध्‍ये खरेदीबाबत आत्‍मविश्वास वाढवत आहेत. कियामध्‍ये आम्‍ही प्रीमियम गतीशीलता अनुभव देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, जे भारतीयांच्‍या सर्वसमावेशक महत्त्वाकांक्षांशी संलग्‍न आहेत.''


ग्राहकांच्‍या डिझाइन, तंत्रज्ञान व सुरक्षितता यासंदर्भातील विविध गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या पोर्टफोलिओसह किया इंडिया आपले मास-प्रीमियम नेतृत्‍व अधिक प्रबळ करत आहे. ब्रँड उर्वरित वर्षामध्‍ये आणि २०२६ मध्‍ये ही विकास गती कायम ठेवण्‍यास उत्तमरित्‍या स्थित आहे.


उपलब्ध माहितीनुसार, किया इंडियाने या महिन्‍यादरम्‍यान ३००४ युनिट्स निर्यात केले ज्‍यासह २०२५ साठी इअर-टू-डेट (YTD) निर्यात २५२७९ युनिट्सपर्यंत पोहोचली आहे.

Comments
Add Comment

सरकारकडून सारथी ॲप अनिवार्य करण्याचा निर्णय मागे, लोकाग्रहास्तव सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: आज अखेर सरकारने लोकाग्रहास्तव आपला निर्णय मागे घेतला आहे. सरकारने आज लोकसभेत देखील लोकांच्या

Sadanand Date : सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक? महाराष्ट्र सरकारने पाठवला केंद्राकडे प्रस्ताव

मुंबई : राज्याच्या विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून,

Orange Gate to Marine Drive Urban Tunnel : मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार, 'ऑरेंज गेट टनेल' जून २०२८ पर्यंत पूर्ण करणार मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

७०० इमारतींच्या खालून भुयार खणणार मुंबई : भुयारी मेट्रोमुळे सोपा झालेला मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार

Stock Market Closing Bell: मजबूत फंडामेंटलची 'अनुभुती' अखेरीस रिबाऊंड पीएसयु बँकेत तुफान घसरण सेन्सेक्स ३१.४६ अंकांने व निफ्टी ४६.२० अंकांने घसरला

मोहित सोमण:आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारातील मजबूत फंडामेंटलची अनुभुती आल्याचे अखेरच्या सत्रातील

Meesho IPO Day 1 Update: मिशोला पहिल्या दिवशी १.२२ पटीने सबस्क्रिप्शन 'ही' आहे माहिती

मोहित सोमण: मिशो या बहुप्रतिक्षित आयपीओला पहिल्या दिवशी १.२२ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. एकूण पब्लिक इशूपैकी

Devendra Fadanvis : 'राजकीय पर्यावरणवाद्यां'कडून कुंभमेळ्याच्या आयोजनात खोडा घालण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचा थेट आरोप!

पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता भव्यदिव्य आयोजन करणार मुंबई : “नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजनात अडथळे