निवडणुकीचा निकाल पुढे ढकलला, MPSC परीक्षेवर होणार परिणाम?

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीचा म्हणजे नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबर रोजी लागणार आहे. सुरुवातीला २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्याची योजना होती. मात्र, काही न्यायालयीन खटल्यांमुळे २४ नगरपरिषदा आणि १५४ सदस्यांच्या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडल्या आहेत. याचा परिणाम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेवर होऊ शकतो.


निकालादिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट 'ब' संयुक्त पूर्व परीक्षा नियोजित केलेली आहे. मात्र निवडणूक प्रक्रियेमुळे प्रशासकीय यंत्रणा व्यस्त राहणार असल्याने परीक्षा सुरळीत पार पडण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण एकाच दिवशी शासनाचे दोन उपक्रम असल्याने परीक्षा केंद्रांची व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, कर्मचारी उपलब्धता आणि वाहतूक यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



राज्यातील लाखो विद्यार्थी महाराष्ट्र राज्य आयोगाच्या गट 'ब' परीक्षेला बसणार आहेत. सातारा, पालघर, रत्नागिरी, नंदुरबार, बीड, धाराशिव, वर्धा, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या सर्वच जिल्ह्यांमध्ये नगरपालिका असल्याने येथील निकाल प्रक्रियेत प्रशासन मोठ्या प्रमाणात व्यस्त असणार आहे. त्यामुळे प्रशासनाला परीक्षा आयोजित करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असून परीक्षेसाठी प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.



महत्त्वाचे म्हणजे परीक्षेला २० दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असल्याने आयोगाने सर्व तयारी केली असून परीक्षा केंद्रांबाबत जिल्हा प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. मात्र, निवडणूक निकालाच्या दिवशीच परीक्षा असल्याने, जर जिल्हा प्रशासनाने परीक्षा घेण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले, तर आयोग त्यावर निर्णय घेऊ शकते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुढील दोन दिवसांत प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेणार आहे. त्यानंतर आयोगाचे अधिकारी आणि सदस्यांची बैठक होऊन यावर निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. जर परीक्षा नियोजनात कोणतीही अडचण येणार नसेल तर ही परीक्षा वेळापत्रकानुसार २१ डिसेंबरलाच होणार आहे.


Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक