नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ६७.६३ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण २६३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सरासरी ६७.६३ टक्के मतदान झाले. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार, या सर्व निवडणुकांचा एकत्रित निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.


राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मतदानाचे प्रमाण जिल्ह्यानुसार आणि शहरानुसार वेगवेगळे आहे. एकूण मतदान ६७.६३ टक्के असले तरी काही ठिकाणी ८८ टक्क्यांपर्यंत मतदान झाले, तर काही ठिकाणी ते ४९ टक्क्यांइतके कमी राहिले. आयोगाने सांगितले की, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून, कुठेही गंभीर अनियमिततेच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या नाहीत.


...........


सर्वाधिक मतदान कुठे झाले ?


आयोगाच्या आकडेवारीनुसार, ग्रामीण आणि डोंगराळ भागातील मतदारांनी या निवडणुकीत अधिक उत्साह दाखवला. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नगरपंचायतींमध्ये अधिक मतदान नोंदवले गेले. येथील सरासरी मतदान सुमारे ८१ टक्क्यांच्या आसपास आहे.


- मुरगुड (कोल्हापूर): ८८%
- मलकापूर (कोल्हापूर): ८७%
- वडगाव (कोल्हापूर): ८६%
- त्र्यंबक (नाशिक): ८६%
- पन्हाळा (कोल्हापूर): ८५%
- चिखलदरा (अमरावती): ८५%
- सिंदखेड राजा (बुलढाणा): ८५%
- माथेरान (रायगड): ८५%
- सालेक्सा (गोंदिया): ८५%
- चंदगड (कोल्हापूर): ८४%


.................


सर्वात कमी मतदान झालेली ठिकाणे


दुसरीकडे, काही शहरी आणि उपनगरीय भागात मतदानाचे प्रमाण कमी राहिले. पुणे आणि नागपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी मतदान ५० टक्क्यांच्या खाली नोंदवले गेले.


- तळेगाव दाभाडे (पुणे): ४९%
- बेसा पिपळा (नागपूर): ५१%
- बुटिबोरी (नागपूर): ५३%
- वाडी (नागपूर): ५३%
- दिगडोह (देवी) (नागपूर): ५४%
- बुलढाणा (बुलढाणा): ५४%
- रत्नागिरी (रत्नागिरी): ५५%
- बल्लारपूर (चंद्रपूर): ५५%
- वनाडोंगरी (नागपूर): ५५%
- भुसावळ (जळगाव): ५५%


………..


सिंधुदुर्गमध्ये किती मतदान ?


- कणकवली : ८०%
- मालवण : ७४%
- वेंगुर्ला : ७४%
- सावंतवाडी : ६९%

Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

महात्मा फुलेंशी संबंधित फाईल मंत्रालयातून गायब; महसूल मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर तयार होणाऱ्या सरकारी डॉक्युमेंटरीशी संबंधित महत्त्वाची फाईल गायब

Student Threatened For Conversion : धर्मांतरासाठी विद्यार्थ्याला धमकी, तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

मुंबई : बोरीवली (पूर्व) येथे कराटेच्या क्लासला जात असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला भररस्त्यात थांबवून

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

Sheetal Tejwani Arrested : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यात मोठी कारवाई; प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला अखेर अटक!

पुणे : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत या प्रकरणातील प्रमुख

Maharashtra Lok Bhavan : महाराष्ट्राचे ‘राजभवन’ झाले ‘लोकभवन’; अधिसूचना जारी!

मुंबई : केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचे नाव ‘लोक कल्याण मार्ग’ आणि ‘पीएम हाऊस’ ऐवजी ‘लोकभवन’ असे