विप्रोने हर्मन समुहाच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोलूशन्स कंपनीचे अधिग्रहण केले

मोहित सोमण: विप्रो लिमिटेड (Wipro Limited) कंपनीने आज मोठी घोषणा केली आहे. कंंपनीने हर्मन समुहाच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोलूशन्स (Digital Transformation Solutions) युनिटचे अधिग्रहण (Acquisition) जाहीर केले आहे. कंपनीने यासाठी ऑगस्ट महिन्यात हालचाली सुरू केल्या असून अखेर यशस्वीपणे कंपनीने हे अधिग्रहण केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ही कंपनी विप्रो समुहाच्या अंतर्गत काम करणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या अधिग्रहणासाठी अद्याप नियामकांची (Regulatory) अंतिम मोहोर लागली नसल्याचे स्पष्ट केले. याविषयी अंतिम मंजुरी अद्याप बाकी आहे. आता नवी कंपनी विप्रो Engineering Global Business Line या नावाखाली कार्यरत असणार आहे. कंपनीने हे अधिग्रहण आपल्या डिजिटल ए आय इंटिग्रेशन तंत्रज्ञानातील इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी केले असल्याचे समजते आहे. कंपनीने हे अधिग्रहण आपली रिसर्च क्षमता वाढवून नावीन्य, शोध, रिसर्च डेव्हलपमेंट योजनेंतर्गत आपली ताकद वाढवण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.


कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, डीटीएस विप्रोमध्ये सखोल उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल परिवर्तन सेवा क्षमता आणते, ज्यामध्ये एम्बेडेड एआय, एम्बेडेड सॉफ्टवेअर, डिव्हाइस अभियांत्रिकी आणि ग्राहक अनुभव प्लॅटफॉर्ममधील मजबूत कौशल्य समाविष्ट आहे. हे अधिग्रहण डीटीएसच्या क्षमतांना विप्रोच्या कन्सल्टिंग नेतृत्वाखालील, एआय संचालित कौशल्याशी जोडेल तर हर्मनच्या एआय सोल्यूशन्सला विप्रो इंटेलिजेंस आमच्या एआय-संचालित प्लॅटफॉर्म, सोल्यूशन्स आणि परिवर्तनात्मक ऑफरिंग्जसह अखंडपणे एकत्रित करेल.यामुळे विप्रोला खऱ्या अर्थाने वेगळे आणि जोडलेले पुढील पिढीचे अनुभव देण्यास सक्षम करेलआणि अभियांत्रिकी सेवांमध्ये जागतिक आघाडीवर म्हणून त्याचे स्थान मजबूत करेल.' असे म्हटले आहे.


या अधिग्रहणाविषयी बोलताना,' आम्हाला विप्रोमध्ये डीटीएस टीम आणि त्यांच्या क्लायंटचे स्वागत करताना आनंद होत आहे. डीटीएसचे अधिग्रहण विप्रोची एआय-संचालित, एंड-टू-एंड अभियांत्रिकी सेवा प्रदान करण्याची क्षमता बळकट करते'असे विप्रो लिमिटेडचे व्यवस्थापकीय भागीदार आणि जागतिक अभियांत्रिकी प्रमुख श्रीकुमार राव म्हणाले आहेत. आमच्या क्षमतांमध्ये डीटीएसची सखोल उत्पादन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान कौशल्य आणि त्यांच्या पूरक उद्योग समाधान आणि बाजारपेठेतील उपस्थितीसह आम्ही वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या लँडस्केपच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आमचे अभियांत्रिकी डीएनए विकसित करत आहोत. हे अधिग्रहण मोठ्या प्रमाणात नवोन्मेष (Innovation) करण्याची, मोजता येण्याजोग्या व्यवसाय मूल्याची आणि सर्व क्षेत्रांमध्ये जटिल परिवर्तनांना समर्थन देण्याची आमची क्षमता वाढवते असेही ते पुढे म्हणाले आहेत.


विप्रो ही आयटी कंपनी असून एआय आधारित तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार कंपनी आहे. कंपनी ६५ देशांमध्ये २३०००० हून अधिक कर्मचारी आणि व्यावसायिक भागीदारांसह कंपनी बाजारात कार्यरत आहे. दुपारी ११.३९ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ०.२३% घसरणीसह शेअर २४९.७० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. गेल्या महिन्याभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ३.८३% वाढ झाली असली तरी इयर टू डेट (YTD) १६.८५% शेअर घसरला आहे.

Comments
Add Comment

Milk adulteration in Navi Mumbai : नवी मुंबईतील महापेतून लाखो रुपयांचा भेसळ केलेल्या दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त

महापे : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरातील पी. के. डेअरीवर धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाने

ED's swift action : ऑनलाइन गेमिंग-बेटिंग प्रकरणात ईडीची धडक कारवाई

नागपूर : ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगच्या माध्यमातून कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अंमलबजावणी

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Historical Letter : तब्बल २८० वर्षांपूर्वीच्या मोडी लिपीतील पत्रातून उलगडली बुंदेलखंडातील मराठ्यांची प्रशासन व्यवस्था

भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती