राज्यातील २६४ नगर परिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान

मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील २६४ नगर परिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मंगळवारी मतदान होणार असून, त्यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण १२ हजार ३१६ मतदान केंद्रांसाठी ६२ हजार १०८ निवडणूक अधिकारी/ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.


नगर परिषदा व नगरपंचायतींच्या २६४ अध्यक्षपदांच्या आणि ६ हजार ४२ सदस्यपदांच्या जागांसाठी उद्या मतदान होईल. संपूर्ण निवडणूक प्रकियेसाठी पुरेशा मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात एकूण १७ हजार ३६७ कंट्रोल युनिट, तर ३४ हजार ७३४ बॅलेट युनिटचा समावेश आहे. अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली मतदान पथके मतदान केंद्रावर सुरळीत पोहोचली आहेत. उद्या सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात होईल. सांयकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असेल.


राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या (एकूण २८८) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय २३ नोव्हेंबर २०२५ रोजी किंवा त्यानंतर आल्याने २४ नगर परिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार नाही. तेथे सुधारित कार्यक्रमानुसार २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता उर्वरित २६४ नगर परिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होईल. त्यातील ७६ नगर परिषदा व नगरपंचायतींमधील न्यायालयीन प्रकरणांमुळे बाधित १५४ जागांसाठीदेखील मतदान होणार नाही. तिथेही सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित बाधित जागांसाठी २० डिसेंबर २०२५रोजी मतदान होईल.

Comments
Add Comment

प्राजक्त तनपुरेंनी माघार घेताच शरद पवारांकडून गोविंद मोकाटेंना उमेदवारी

मुंबई: आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत

Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा पाय आणखीच खोलात; ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

मुंबई : अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून, स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवणाऱ्या

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Sunil Tatkare: 'हा फक्त एक उमेदवारी अर्ज नाही, तर अजितदादांनी निवडलेल्या विकासाच्या वाटेवर पुढे जाण्याचा निर्धार'

बारामती: राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी आज बारामती विधानसभा

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

बिनविरोध नसला तरी सुनेत्राताईंना विक्रमी विजय मिळवा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारामतीकरांना आवाहन

बारामती: महाराष्ट्राच्या जडणघडणीत माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या