निर्देशांकाला धोका? परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची शेअर बाजारात विक्री वाढली

प्रतिनिधी: चांगल्या गुंतवणूक वाढीमुळे शेअर बाजारात ऑक्टोबर महिन्यात समाधानकारक वाढ नोंदवली गेली होती. प्रामुख्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Institutional Investors FII) यांच्याकडून ऑक्टोबरमध्ये वाढलेल्या खरेदीनंतर आता परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा बाजारात विक्री सुरू केली आहे. त्यामुळे निर्देशांकात अधिक प्रमाणात घसरण झालेली पहायला मिळत आहे. प्रोविजनल आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये भारतीय शेअर बाजारातून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ३७६५ कोटी रुपये काढून घेतले आहेत. ही गुंतवणूक जागतिक जोखीम मुक्त भावना, जागतिक तंत्रज्ञान समभागांमधील अस्थिरता आणि दुय्यम बाजारांपेक्षा प्राथमिक बाजारांना अधिक निवडक पसंती यामुळे झाले असल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले. नोव्हेंबरमधील रोख गुंतवणूकीचा प्रवाहाचा कल जागतिक आणि देशांतर्गत मजबूत फंडामेंटलसह घरगुती गुंतवणूकदारांची वाढलेली गुंतवणूक या दोन्ही कारणांमुळे तेजी कायम राहिली होती.


मात्र जागतिक पातळीवर यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या मार्गाभोवती अनिश्चितता, मजबूत अमेरिकन डॉलर आण आगामी बाजारपेठांमध्ये कमकुवत जोखीम घेण्याची क्षमता यामुळे परदेशी गुंतवणूकदार सावध राहिले आहेत. माध्यमांना प्रतिक्रिया देताना सतत भूराजकीय तणाव आणि अस्थिर कच्च्या तेलाच्या किमतींमुळे अस्थिरता आणखी मजबूत झाली असे तज्ञांनी म्हटले आहे. स्थानिक पातळीवर, वाढलेल्या मूल्यांकनांमुळे आणि मंदावलेल्या औद्योगिक निर्देशकांमुळे ही सावधगिरी वाढली ज्यामुळे स्थिर आर्थिक पार्श्वभूमी असूनही गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला असेही तज्ञांचे मत आहे.


याविषयी माध्यमांना प्रतिक्रिया देताना एंजल वनचे वरिष्ठ मूलभूत विश्लेषक वकारजावेद खान यांनी नमूद केले की नोव्हेंबरमधील बाहेर पडण्याचा प्रवाह प्रामुख्याने जागतिक जोखीम टाळणे आणि तंत्रज्ञान समभागांमधील (Tech Shares) अस्थिरतेमुळे होता. विशेषतः या गुंतवणूकीतील जावकीचा (Outflow) फटका आयटी सेवा, ग्राहक सेवा आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांना सर्वाधिक बसला आहे. तरीही आकडेवारी बघता,सर्वच निर्देशक सतत मंदीच्या ट्रेंडकडे निर्देश करत नाहीत.


जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही के विजयकुमार यांचा असा विश्वास आहे की एफपीआय प्रवाहात उलटेपणाचा कोणताही स्पष्ट पुरावा अद्याप मिळालेला नाही.
त्यांनी नमूद केले की एफपीआय काही दिवस खरेदीदार होते आणि काही दिवस विक्रेते होते, हे संकेत देते की परिस्थिती बदलत असताना प्रवाह बदलू शकतो.


चौदा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर २७ नोव्हेंबर रोजी निफ्टी आणि सेन्सेक्सने नवीन विक्रम आज गाठले आहेत तसेच दुसऱ्या तिमाहीत सुधारित कॉर्पोरेट कमाई आणि तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत आणखी वाढीच्या अपेक्षांमुळे बाजारातील भावना उंचावल्या आहेत असे त्यांनी पुढे सांगितले. पुढे पाहता, एंजल वनच्या खान म्हणाले की डिसेंबरमधील एफपीआय आकडेवारी कदाचित यूएस फेडरल रिझर्व्हच्या दर कपातीच्या संकेतांवर आणि भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारातील पुढील प्रगतीवर अवलंबून असेल.


आर्थिक वर्ष २०२५ मध्ये आतापर्यंत, परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय इक्विटीजमधून १.४३ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली असून दरम्यान कर्ज बाजारात, एफपीआय ने ८११४ कोटी रुपये गुंतवले तर त्याच कालावधीत ५०५३ कोटी रुपये बाजारात काढल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

मुलगा व्हावा म्हणून छळ; पैशांच्या मागणीला कंटाळून २५ वर्षीय गर्भवतीची आत्महत्या

नांदेड : मुलाच्या हव्यासापोटी आणि पैशांच्या सततच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या २५ वर्षीय गर्भवती विवाहितेने

भूराजकीय स्थितीचा रूपयावर जबरदस्त फटका रूपया ८९.७६ या ऐतिहासिक पातळीवर घसरला

मोहित सोमण: प्रादेशिक पेक्षाही जागतिक भूराजकीय परिस्थितीत बदलत्या अस्थिर समीकरणामुळे आज रुपयात ऐतिहासिक घसरण

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या एसयुव्ही कार विक्रीत लक्षणीय २२% वाढ

मोहित सोमण: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या विक्रीत वाढ अपेक्षित होती. त्यात धर्तीवर कंपनीने आज आकडेवारी जाहीर

Para-athlete...लग्नातील किरकोळ वादातून हरियाणातील पॅरा-अ‍ॅथलिटची निर्घृण हत्या

हरियाणा : रोहतक येथे एका राष्ट्रीय स्तरावरील पॅरा-अ‍ॅथलिटवर झालेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात

HSBC India Manufacturing Manager Index जाहीर- भारताच्या ऑर्डर्समध्ये मजबूत वाढ मात्र, 'यामुळे' नऊ महिन्यातील सर्वाधिक घसरण

प्रतिनिधी: एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजर (HSBC India Manufacturing Manager Index) निर्देशांक काही क्षणापूर्वी जाहीर झालेला

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल