Nanded crime : नांदेड हादरले! आंतरजातीय प्रेमसंबंधांच्या वादातून तरुणाची हत्या; प्रेयसीने मृतदेहाशी केले 'अखेरचे लग्न'

नांदेड : एकविसाव्या शतकातही महाराष्ट्रात जातीभेदाचा विखार किती भयंकर आणि जीवघेणा आहे, याचे दुःखद प्रत्यंतर गुरुवारी नांदेडमध्ये आले. नांदेडच्या मिलिंद नगर इटवारा परिसरात सक्षम ताटे (वय २०) या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सक्षम ताटे याचे आंचल मामीडवार या तरुणीशी प्रेमसंबंध होते. हे आंतरजातीय प्रेमसंबंध आंचलच्या कुटुंबाला मान्य नव्हते. याच वादातून आणि रागातून आंचल मामीडवार हिचे वडील गजानन मामीडवार, भाऊ हिमेश मामीडवार आणि साहिल मामीडवार यांनी सक्षम ताटे याची डोक्यात फरशी आणि दगड घालून हत्या केली. या घटनेनंतर आंचल मामीडवार या तरुणीने केलेली कृती राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. आंचलने सक्षमचा मृतदेह घरी आणल्यानंतर, त्याच्यासोबत लग्नाचे काही विधी पूर्ण केले. दोघांच्याही अंगाला हळद लावण्यात आली आणि त्यानंतर आंचलने सक्षमच्या नावाने आपल्या कपाळावर कुंकू लावले. या दोघांच्या शेवटच्या प्रेमप्रसंगाचे आणि अंत्यसंस्काराचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सक्षम आणि आंचल या दोघांचीही कौटुंबिक पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती, असे बोलले जात आहे. मात्र, जातीभेदाच्या या विखारी स्वरूपाने एका प्रेम कहाणीचा असा दुःखद अंत केला आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.



"जात वेगळी म्हणून माझ्याच घरच्यांनी संपवलं!"


नांदेड येथील सक्षम ताटे या तरुणाच्या निर्घृण हत्येप्रकरणी त्याची प्रेयसी आंचल मामीडवार हिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अत्यंत धक्कादायक आणि गंभीर खुलासे केले आहेत. तिने थेट आपल्या वडील आणि भावांवरच हत्येचा आरोप केला असून, यामागे जातीभेद हेच मुख्य कारण असल्याचे सांगितले आहे. आंचलने सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून सक्षम आणि माझे प्रेमसंबंध होते, पण ते आमच्या घरच्यांना अजिबात मान्य नव्हते. "सक्षम बौद्ध होता आणि आम्ही पद्मशाली समाजाचे आहोत. जात वेगळी असल्यामुळेच माझे वडील (गजानन मामीडवार) हे प्रेमसंबंध नाकारत होते. ते मला दुसऱ्या कोणाशीही लग्न करून देण्याची तयारी दर्शवत होते." आंचलच्या म्हणण्यानुसार, सक्षम ताटे याच्यावर पूर्वी एमपीडी (MPDA) पडली होती आणि तो जेलमधून सुटून आल्यापासून तिच्या घरच्यांनी त्याची 'गेम टाकण्याची' योजना आखली होती. "ते मला नेहमी धमकी देत होते की, आम्ही सक्षमला मारून टाकणार. त्यांनी सक्षमला गोड बोलून इटवारा परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर नशा करून त्याला मारले. सक्षमवर तीन गोळ्या झाडल्या तरी त्याला काही झाले नाही. मग त्याच्या डोक्यात फरशी टाकून त्याला ठार मारले," असे आंचल मामीडवार हिने अत्यंत भावूक होऊन सांगितले. या आंतरजातीय प्रेमसंबंधामुळेच सक्षमला संपवण्यात आले, असा स्पष्ट आरोप तिने वडील गजानन मामीडवार, भाऊ हिमेश मामीडवार आणि साहिल मामीडवार यांच्यावर केला आहे. "आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे," अशी मागणी आंचल मामीडवार हिने केली आहे.



मृतदेहाशी विवाह! "सक्षम नसला तरी मी आयुष्यभर त्याच्यासोबत राहीन" : आंचल मामीडवार


नांदेड येथील सक्षम ताटे या तरुणाच्या हत्येमुळे एका प्रेम कहाणीचा अत्यंत दुःखद अंत झाला आहे. मात्र, या घटनेनंतर सक्षमची प्रेयसी आंचल मामीडवार हिने घेतलेल्या निर्णयाने सर्वांना भावुक केले आहे. आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी 'अखेरचा विवाह' करून आयुष्यभर त्याच्यासोबत राहण्याची शपथ घेतली आहे. सक्षम ताटे याचा मृतदेह त्याच्या घरी आणण्यात आला, तेव्हा त्याचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराची मोठी गर्दी झाली होती. सक्षमचा मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. या हृदयद्रावक वातावरणात आंचलने एक भावनिक निर्णय घेतला. तिने सक्षमच्या मृतदेहाला आणि स्वतःच्या अंगाला हळद लावली. त्यानंतर तिने सक्षमच्या नावाने आपल्या कपाळावर कुंकू लावले आणि 'आम्ही आता लग्न केले आहे' असे जाहीर केले. या अत्यंत भावनिक प्रसंगी आंचलने प्रसारमाध्यमांना सांगितले की, "तो (सक्षम) आता नसला तरी आमचं प्रेम जिवंत आहे. मी मनाने कायम त्याच्यासोबत राहीन." एवढेच नव्हे तर, तिने सक्षमच्या घरीच कायमस्वरूपी राहण्याचा निर्णय घेतला आहे. "मी आता सक्षमच्या घरीच राहणार आहे, मला सक्षमसोबतच राहायचे आहे," असे आंचल मामीडवार हिने ठामपणे सांगितले. आंचलच्या या निर्णयामुळे तिचे सक्षमवरील निरपेक्ष प्रेम दिसून येते.

Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

उद्धव ठाकरे यांचे विधान आचारसंहिता भंग करणारे ? मंत्री एँड आशिष शेलार यांचा सवाल

ठाकरेंचे सल्लागार सडके आणि हे रडके मुंबई : एखादा सराईत असतो त्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे वारंवार निवडणुकीच्या

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या