Nagarparishad Election : अवघे काही तास शिल्लक... अन् निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय; 'या' तीन नगरपरिषदांच्या निवडणुकीला स्थगिती

बारामती : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज, रविवार (दि. ३० नोव्हेंबर) रोजी सायंकाळी पाच वाजता या निवडणुकांसाठीचा प्रचार संपुष्टात येणार आहे. त्यानंतर, मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. प्रचार संपण्यापूर्वीच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने बारामती, फलटण आणि महाबळेश्वर या तीन महत्त्वाच्या नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे. या निवडणुका पुढे ढकलण्यामागे न्यायालयीन कारण आहे. जिल्हा न्यायालयात निवडणूक प्रक्रियेबाबत एक याचिका (Petition) दाखल करण्यात आली होती. जिल्हा न्यायालयाने या याचिकेवर निकाल देण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी घेतल्यामुळे निवडणूक आयोगाला हा निर्णय घ्यावा लागला. आयोगाच्या निर्णयानुसार, आता फलटण आणि महाबळेश्वर येथील मतदानप्रक्रिया अनुक्रमे २० आणि २१ डिसेंबर रोजी पार पडेल. यामुळे, बारामती वगळता इतर दोन नगरपरिषदांमधील राजकीय वातावरण आणखी काही दिवस तापलेले राहणार आहे.



बारामती नगरपरिषद निवडणूक २० डिसेंबरपर्यंत पुढे


न्यायालयीन वादामुळे बारामती नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत असताना, प्रक्रिया पावणेतीन वाजताच बंद झाली होती, यावर काही जणांनी आक्षेप घेतला होता. विशेषतः, न्यायालयाने भाजपच्या दोन उमेदवारांना अर्ज भरण्याची तारीख संपल्यानंतरही अर्ज भरण्याचे निर्देश दिले होते. तसेच, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरील आरोपांबाबतही न्यायालयीन निर्णय प्रलंबित असल्याने आयोगाने वाद टाळण्यासाठी हा निर्णय घेतला. बारामतीमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह सात प्रभागातील उमेदवारांविरोधात बारामतीच्या सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सत्र न्यायालयाने ही याचिका फेटाळली असली तरी, नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार (Principle of Natural Justice) ज्या ठिकाणी याचिका दाखल झालेल्या आहेत, त्याची अपिलाची मुदत (Appeal Deadline) संपली नसल्याने निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयानुसार, बारामतीचे नगरपरिषद मतदान आता थेट २० डिसेंबर रोजी घेतले जाईल. नगराध्यक्षपदासह ज्या सात जागांसाठी याचिका दाखल झाली होती, त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.


नवा कार्यक्रम जाहीर : ४ डिसेंबर रोजी.


अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : १० डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत.


अंतिम उमेदवारांची यादी व चिन्ह : ११ डिसेंबर २०२५ रोजी जारी.


मतदान : २० डिसेंबर रोजी (सकाळ साडेसात ते संध्याकाळी साडेपाच).


मतमोजणी व निकाल : २१ डिसेंबर २०२५ रोजी.


नव्या प्रक्रियेत नव्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.



यवतमाळ नगरपरिषद निवडणूकही लांबणीवर?


राज्यात काही नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्यानंतर, आता यवतमाळ जिल्ह्यातील काही नगरपरिषदेच्या निवडणुकांवरही लांबणीवर जाण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यातील दिग्रस, पांढरकवडा आणि वनी येथील काही प्रभागांची निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडण्यामागे मुख्यत्वे न्यायालयीन कारण असल्याचे बोलले जात आहे. तसेच, ज्या ठिकाणी तांत्रिक चुका झाल्या, तेथे निवडणूक आयोगाने नव्याने कार्यक्रम दिला असून, या निवडणुका आता २० डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. या संभाव्य बदलांबाबत आणि निवडणुकीच्या तारखा पुढे ढकलण्याबाबत निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती (Official Confirmation) समोर आलेली नाही. तसेच, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडूनही याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे, यवतमाळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या उमेदवारांचे आणि मतदारांचे लक्ष निवडणूक आयोगाच्या पुढील घोषणेकडे लागले आहे.



राज्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज


राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाची यंत्रणा आता पूर्णपणे सज्ज झाली आहे. या निवडणुकांमध्ये एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मोठ्या मतदारसंख्येसाठी आयोगाने सुमारे १३ हजार ३५५ मतदान केंद्रांची (Polling Stations) व्यवस्था केली असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ईव्हीएम मशीनची (EVM) देखील व्यवस्था करण्यात आली आहे. यात १३ हजार ७२६ कंट्रोल युनिट्स आणि २७ हजार ४५२ बॅलेट युनिट्सची उपलब्धता करण्यात आली आहे. राज्यातील एकूण २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या (एकूण २८८) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर, ३ डिसेंबरला सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोगाने सर्व ठिकाणी शांततापूर्ण आणि पारदर्शक मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

Samarjeetsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये

रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हाती घेतले कमळ; हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे वैर संपल्याची दिली माहिती मुंबई :

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५