"मोबाईल हातात असला की उंदरासारखे... " जया बच्चन यांची पापाराझींबद्दल स्पष्ट प्रतिक्रिया

मुंबई : अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी पुन्हा एकदा पापाराझींवर आपला कठोर सूर कायम ठेवला आहे. एका मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांचे वास्तविक नाते माध्यमांशी आहे, मात्र पापाराझींशी कोणतेही नाते नाही, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.


मुलाखतीदरम्यान जेव्हा त्यांना विचारण्यात आले की त्यांचे माध्यमांशी असलेले नाते नक्की कसे आहे, तेव्हा जया बच्चन म्हणाल्या, “माझं माध्यमांशी खूप चांगले नाते आहे. माझे वडील पत्रकार होते. मला खऱ्या पत्रकारांविषयी खूप आदर आहे. पण माझे पापाराझींशी अजिबात पाट नाही, बाहेर गलिच्छ कपडे घालून, मोबाईल कॅमेरा हातात घेऊन फोटो काढणाऱ्यांना पत्रकार किंवा मीडियाची लोक म्हणतात का? हे लोक कोण आहेत? ते देशाचे प्रतिनिधित्व करतात का?”


पापाराझींविषयी नाराजी व्यक्त करताना त्यांनी म्हटले, “मोबाईल कॅमेरा आला म्हणजे कोणाचेही केव्हाही फोटो काढत बसायचे? त्यांचे शिक्षण, पार्श्वभूमी काय आहे? अशा लोकांना मी पसंत करत नाही.” सोशल मीडियाबद्दल बोलताना जया बच्चन यांनी सांगितले की त्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर सक्रिय नाहीत. एका हॉटेल मध्ये गेले असता तिथल्या कर्मचाऱ्याने त्यांना सांगितले होते की त्या सोशल मीडियावर सर्वाधिक टीका होणाऱ्या व्यक्तींपैकी त्या एक आहेत. यावर त्या म्हणाल्या, “मला काही फरक पडत नाही. कोणाला माझा द्वेष करायचा असेल तर ते त्यांचे मत आहे.”


आधुनिक सेलिब्रिटी संस्कृतीवर टीका करत जया बच्चन पुढे म्हणाल्या, “आजकाल अनेक कलाकार विमानतळावर स्वतःच पापाराझींना बोलावतात. मी अशा लोकांना ओळखत नाही. माझा नातूही अभिनयात आहे, पण तो कोणत्याही सोशल नेटवर्कवर नाही. शेवटी त्यांनी कठोर शब्दांत म्हटले, “स्वतः ला जर स्वतःचेच फोटो काढण्यासाठी मीडियाला बोलवावे लागत असेल, तर तुम्ही कोणत्या प्रकारचे सेलिब्रिटी आहात?”

Comments
Add Comment

Ek Din : मोठ्या पडद्यावर ५० वर्षांनंतर पुन्हा खुलणार जपानी रोमांस, 'एक दिन' सिनेमातील 'कोनिचिवा' गाणं रिलीज

मुंबई : अभिनेता आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी फिल्म ‘एक दिन’, ज्यामध्ये साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत

Gayatri Datar : 'त्या' प्रकरणाबाबत गायत्री दातारची आणखी एक पोस्ट, म्हणाली...

मुंबई : 'तुला पाहते रे' मालिकेतून घराघरात पोहचलेली लोकप्रिय अभिनेत्री गायत्री दातार हिच्यासोबत एक धक्कादायक

Nick Jonas : बॉलिवूडच्या गाण्याची निक जोनसला भूरळ, पत्नी प्रियांका नव्हे तर माधुरीच्या 'या' प्रसिद्ध गाण्यावर थिरकला

मुंबई : भारतीय सिनेसृष्टी जगभरात प्रसिद्ध असून बॉलिवूडच्या सिनेमांसोबतच गाण्यांनाही जगभरात पंसती मिळते.

Tighi Movie : ‘तिघी’ सिनेमाची आंतरराष्ट्रीय झेप; न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये निवड

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘तिघी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून, प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या

Sara Arjun : धुरंधर गाजवल्यानंतर आता सारा अर्जून साकारणार 'ही' जबरदस्त भूमिका

मुंबई : धुरंधर २ सिनेमानं जगभरात धुमाकूळ घातला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर १००० कोटींची कमाई केली. या सिनेमात तिनं

Akshay Kumar Injured : 'भूत बंगला'च्या शूटिंगदरम्यान अभिनेता अक्षय कुमारला दुखापत, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारला त्याच्या आगामी 'भूत बंगला'(Bhooth Bangla) या हॉरर-कॉमेडी सिनेमाच्या