Tighi Movie : ‘तिघी’ सिनेमाची आंतरराष्ट्रीय झेप; न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये निवड

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘तिघी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून, प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहात यशस्वीपणे सुरू आहे. आशयघन कथा, दमदार अभिनय आणि प्रभावी भावनिक मांडणी यामुळे ‘तिघी’ने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आता या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, ‘तिघी’ची प्रतिष्ठित न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२६ (एनवायआयएफएफ)मध्ये क्लोजिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली आहे.


‘तिघी’ क्लोजिंग नाईट फिल्म म्हणून जाहीर करण्यात आले असून, या घोषणेमुळे चित्रपटाच्या यशात आणखी भर पडली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही दखल मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.


आई-मुलीच्या नात्यांतील गुंतागुंत, त्यांच्या मनात दडलेले भावविश्व, न बोललेले संवाद आणि काळानुसार बदलणारे नाते या सगळ्यांचा अत्यंत सूक्ष्म आणि वास्तववादी वेध या चित्रपटात घेतला आहे. कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा आणि त्यांची नैसर्गिक अभिनयशैली यामुळे ‘तिघी’ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. आई-मुलीच्या नात्यातील भावना सार्वत्रिक असतात. त्यामुळे मुंबई असो किंवा न्यूयॉर्क, या चित्रपटाची कथा जगभरातील प्रेक्षकांना जोडते व आपलीशी वाटते.



यापूर्वी या संचाच्या ‘पुणे ५२’, ‘जून’, ‘गोदावरी’ आणि ‘रावसाहेब’ या चित्रपटांनी एनवायआयएफएफमध्ये आपली छाप पाडली होती. आता ‘तिघी’ हा चित्रपट या प्रतिष्ठित महोत्सवात दाखल होणारा त्यांचा पाचवा चित्रपट ठरला आहे. एनवायआयएफएफने सातत्याने त्यांच्या आशयप्रधान चित्रपटांना व्यासपीठ दिले असून, यंदा ‘तिघी’ला क्लोजिंग फिल्मचा मान देत ही परंपरा अधिक दृढ केली आहे.


याबद्दल दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणतात, “एनवायआयएफ सारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘तिघी’ची क्लोजिंग फिल्म म्हणून निवड होणे ही आमच्यासाठी खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. हा चित्रपट अतिशय वैयक्तिक आणि मनाला भिडणाऱ्या नात्यांवर आधारित आहे. प्रेक्षकांनी त्याला दिलेले प्रेम आमच्यासाठी खूप खास आहे. एनवायआयएफएफने याआधी आमच्या चित्रपटांना दिलेल्या व्यासपीठानंतर, ‘तिघी’ला मिळालेला हा सन्मान आमच्यासाठी आणखी खास आणि भावनिक आहे.”


सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका असून जीजिविषा काळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे, नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Babita Singh Reporting Release Date : ‘पाताळ लोक’च्या निर्मात्यांची नवी पेशकश; एक हत्या, दोन रहस्यं आणि स्वतःचा शोध घेणारा एक प्रवास

- प्राइम व्हिडिओने रोमांचक इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’च्या वर्ल्डवाइड प्रीमियरची

Actress Ananya Raj : अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या २८व्या वर्षी निधन; झोपेत घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी निधन झालं

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा