गोंदिया जिल्ह्यात बिबट्याचा कहर; शेतात गेलेल्या ९ वर्षीय रुचीचा उपचारादरम्यान मृत्यू

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे लोकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तिरोडा तालुक्यातील इंदोरा निमगाव येथे वडिलांसोबत शेतात गेलेल्या ९ वर्षीय मुलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालत गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बालिकेचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.


मृत मुलीचे नाव रुची देवानंद पारधी (वय ९ ) असे असून ती गुरुवारी सकाळी वडिलांसोबत शेतावर गेली होती. वडील तारांचे कुंपण लावत असताना रुची शेताच्या बांधावर उभी होती. यावेळी जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला केला आणि तिला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच वडील आणि आसपासच्या शेतकऱ्यांनी धाव घेत आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्याने रुचीला सोडून जंगलाच्या दिशेने पलायन केले.


गंभीर जखमी रुचीला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला गोंदिया येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. रात्री आठच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेनंतर परिसरात पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे.


दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील दोडके जंगल भागात ७२ वर्षीय कन्सु हन्नु उईके यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला. या मृत्यूमागे हिंस्त्र प्राण्याचा हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. २८ नोव्हेंबर रोजी ते सरपणासाठी जंगलात गेले होते, परंतु घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध घेतला. गावापासून सुमारे एक किलोमीटरवर त्यांचा मृतदेह आढळला. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा वावर असल्याने गावकऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. वन विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून गोरेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Comments
Add Comment

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! ‘वंदे भारत’च्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या सविस्तर

पुणे: सध्याच्या घडीला संपूर्ण देशभरात वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भारतील अनेक

विवाहासाठी दिव्यांगांना आता मिळणार अडीच लाख रुपये, राज्य सरकारचा मोठा निर्णय

सोलापूर : दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी, दिव्यांग आत्मनिर्भर बनावा, विवाहापासून

निकालाआधी अनगरमध्ये भाजपने उधळला गुलाल! पहिल्यांदाच निवडणूक आणि बिनविरोध निवड

सोलापूर : सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतसाठी पहिल्यांदाच निवडणूक होत असली तरी ही निवडणूक

पुणे-महाबळेश्वर ई-शिवाई बस सुरू

पुणे : स्वारगेट आगारातर्फे महाबळेश्वरसाठी वातानुकूलित ई-शिवाई बस सेवा सुरू केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंच्या वाहनाला अपघात

अमरावती : अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतले आमदार संजय खोडकेंच्या वाहनाला

Crime News : जमिनीचा तुकडा की रक्ताचा सडा? अर्ध्या गुंठ्यासाठी पोटच्या गोळ्याने जन्मदात्यांचे डोके ठेचले; हुपरी हादरली! सैतानी क्रूरता

हुपरी : हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात एका माथेफिरू मुलाने केवळ मालमत्तेच्या वादातून आपल्या वृद्ध