IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकत ऋतुराज गायकवाड याला संधी; रिषभ पंतला डच्चू

रांची : रांची येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना रंगत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडिया मायदेशात वनडे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. कसोटी मालिकेनंतर आयोजित करण्यात आलेल्या या सामन्यापूर्वी दुपारी १ वाजता नाणेफेक झाली आणि १.३० वाजता सामन्याला सुरुवात झाली.


नाणेफेकीत दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवत भारताला प्रथम फलंदाजीला बोलावले. या सामन्यासाठी नियमित कर्णधार टेम्बा बुवमा याला विश्रांती देण्यात आली असून एडन मार्क्रमकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. एडनने टॉस जिंकत मैदान आणि परिस्थिती लक्षात घेऊन बॅटिंगचा निर्णय भारतावर सोडला. भारत ३०० धावांचा टप्पा ओलांडतो का, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.


भारतीय संघात मोठा बदल करत ऋतुराज गायकवाडला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. अलीकडील लिस्ट ए मालिकेत ऋतुराजने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जबरदस्त कामगिरी करत २०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. त्या फॉर्मच्या जोरावर त्याला संधी मिळाली. मात्र विकेटकीपर ऋषभ पंत आणि नितीश रेड्डी यांना या सामन्यात स्थान मिळाले नाही.


रांचीच्या मैदानावर भारताला पहिल्यांदा बॅटिंग मिळाल्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीकडून दमदार सुरुवातीची अपेक्षा आहे. दोघेही सध्या चांगल्या लयीत असल्याने भारतीय डावाला भक्कम चालना मिळेल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.



टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन


रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (कॅप्टन व विकेटकीपर), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा.


दक्षिण आफ्रिकेची अंतिम ११


एडन मार्क्रम (कर्णधार), रायन रिकेल्टन, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मॅथ्यू ब्रेट्झके, टोनी डी झोर्झी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, प्रिनेलन सुब्रेन, नांद्रे बर्गर, ओटनील बार्टमन.

Comments
Add Comment

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो