रेवस - रेड्डी सागरी मार्गावरील आणखी एका पुलाच्या कामाला गती

नव्या रेवदंडा - साळाव पुलासाठी १२५० कोटींचा निधी मंजूर


अलिबाग : रेवस-रेड्डी सागरी मार्गावरील आणखी एका पुलाच्या कामाला गती मिळणार असून, रेवदंडा-साळाव दरम्यानच्या नवीन पुलाचे काम गुरुवारपासून सुरू झाले आहे. अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत या पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने रेवस-करंजा पाठोपाठ आता रेवदंडा-साळाव पुलाच्या कामालाही सुरुवात होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी कोकणातील सागरी मार्गावरील सात पुलांच्या राज्य सरकारने मंजुरी दिली होती. एमएसआरडीसीच्या माध्यमातून या पुलांचे काम केले जाणार होते.


तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या पुलांच्या कामांचा भूमिपुजन सोहळा पार पडला होता. मात्र, रेवस-करंजा पुलाचा अपवाद सोडल्यास इतर पुलांच्या कामाला सुरुवात होऊ शकली नव्हती. आता मात्र रेवदंडा ते साळाव दरम्यानच्या पुलाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. अशोका बिल्डकॉन कन्स्ट्रक्शन लि. कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे.
रेवस-रेड्डी सागरी महामार्ग निर्मितीत नव्याने उभारण्यात येत असलेल्या कुंडलिका खाडीवरील रेवदंडा-साळाव पुलासाठी १ हजार २५० कोटी कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. बॅरिस्टर ए. आर. अंतुलेंनी यांनी १९८० काळात सागरी महामार्गाची संकल्पना मांडली होती.


मात्र या पुलांची कामे रखडल्याने हा सागरी महामार्ग अस्तित्वात येऊ शकला नव्हता. आता चार दशकांच्या प्रतिक्षेनंतर या कामाला गती मिळणार आहे. राज्य सरकारने रेवस-रेड्डी मार्गाच्या सुधारित आराखड्याला मंजुरी दिली असून, यासाठी साडेनऊ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पाच टप्प्यात रस्त्याचे काम होणार आहे. या सागरी मार्गामुळे किनाऱ्यालगतची शहरे मुख्य रस्त्याशी जोडली जाणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, यामुळे मुंबई ते गोवा हे अंतरही कमी होणार आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या आराखड्यात १६५ किलोमीटर मार्गाचे चौपदरीकरण केले जाणार असून, तर उर्वरित मार्ग हा दुपदरी असणार आहे. आधीच्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा करून हा मार्ग तयार केला जाणार आहे. ३३ प्रमुख गावे आणि शहरांच्या ठिकाणी बाह्यवळण रस्ते तयार केले जाणार आहेत. यासाठी काही, तसेच चौपदरीकरणाच्या टप्प्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. सागरी मार्गावर खाड्यांवर अत्याधुनिक पद्धतीच्या पुलांची उभारणी केली जाणार आहे. यामुळे मुंबई ते गोवा हे अंतर कमी होऊन पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


कोकणात सुरू असलेल्या रेवस रेड्डी सागरी महामार्गावर ९ ठिकाणी खाडीवर पूल उभारण्याचे काम सुरू आहे. यात रेवस-कारंजा, रेवदंडा, आगरदांडा, केळशी, काळबादेवी, दाभोळ, जयगड अशा खाडीपुलांचा समावेश आहे. यातील काही पुलांची कामे प्रगतीपथावर असून या कामांची गती वाढवण्यात आली आहे.


Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .

श्रीराम लाईफ इन्शुरन्समधून पिरामल फायनान्स बाहेर पडणार 'या' कारणामुळे,६०० कोटीचा एकूण सौदा जाहीर

मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेड (Piramal Finance Limited) कंपनीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीतील आपला संपूर्ण १४.७२% हिस्सा

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग रोज खा सुकं खोबर

रोज जेवण बनवताना वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो.त्यामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे