New Aadhaar Card : आधार कार्डचा गैरवापर थांबणार! आता फोटो आणि QR कोडसह Aadhaar Card; जुन्या कार्डापेक्षा किती वेगळं आणि सुरक्षित?

मुंबई : सध्या बँक असो, महाविद्यालय असो किंवा इतर कोणतेही शासकीय काम; ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे आधार कार्डमध्ये असलेली व्यक्तीची जन्म तारीख, पत्ता, वडिलांचे नाव आणि इतर माहिती अत्यंत गोपनीय ठेवणे आवश्यक आहे. आधार कार्डचा होणारा गैरवापर (Misuse) आणि दुरुपयोग थांबवण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) एक मोठा बदल करत आहे. UIDAI चे प्रमुख भुवनेश कुमार यांनी एका ऑनलाईन परिषदेत या महत्त्वपूर्ण बदलांविषयी भाष्य केले आहे. नवीन नियमांनुसार, आता आधार कार्ड अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह (Security Features) येणार आहे. या आधार कार्डवर व्यक्तीचा फोटो आणि एक खास QR कोड (Quick Response Code) दिलेला असेल. येत्या डिसेंबर महिन्यापासून हे नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे. या बदलामुळे आधार कार्डची सत्यता तपासणे अधिक सोपे आणि जलद होणार आहे, ज्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या ठिकाणी पत्ता प्रमाणित करणे आणि व्यक्तीची ओळख पटवणे अधिक सुरक्षित होईल.



UIDAI चे नवीन नियम


ओळखीचा महत्त्वाचा पुरावा असलेल्या आधार कार्डाचा गैरवापर थांबवण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) एक मोठा आणि ऐतिहासिक बदल करत आहे. नागरिकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी हे नवीन नियम लवकरच लागू होणार आहेत. सध्या आधार कार्डमधील १२ अंकी क्रमांक आपली माहिती दर्शवतो. जर कोणी या कार्डचा फोटो घेतला आणि या अंकांच्या आधारे दुरुपयोग केला, तर नागरिकांची वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याचा धोका असतो. नागरिकांची माहिती सुरक्षित राहावी यासाठी नवीन नियमांनुसार, आता आधार कार्डमध्ये केवळ एक फोटो आणि क्यूआर कोड (QR Code) देण्यात येणार आहे. या नवीन नियमानुसार, ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी (Offline Verification) कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला आधार संख्या (Aadhaar Number) आणि बायोमॅट्रिकची (Biometric) माहिती जतन करण्याची (Store) परवानगी नसेल. हा नागरिकांच्या माहितीच्या सुरक्षिततेसाठी (Security) आणि गोपनीयतेसाठी (Privacy) UIDAI ने घेतलेला अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. यामुळे आधार कार्डावर आधारित फसवणुकीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे.



नवीन आधार कार्डमध्ये 'हे' बदल दिसणार


नवीन आधार कार्डवर आता केवळ फोटो आणि QR कोड दिसेल


नाव, पत्ता, जन्मतारीख आणि १२ अंकांचा आधार कार्ड क्रमांक दिसणार नाही


संबंधित QR कार्डमध्ये सर्व माहिती सुरक्षित जतन असेल


ऑफलाईन व्हेरिफिकेशन अधिक सोपं असेल आणि डेटा चोरीस आळा बसेल



लवकरच UIDAI चं नवीन ॲप लॉन्च होणार


आधार कार्डाच्या सुरक्षिततेत वाढ करण्यासाठी UIDAI आता नवीन मोबाईल ॲप (New Mobile App) सुद्धा लाँच करण्याच्या तयारीत आहे. हे आगामी मोबाईल ॲप सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक काळजी घेऊन डिझाइन केलेले असेल. या ॲपमध्ये QR कोड स्कॅनिंग आणि फेसियल रिकॉग्निशन (Facial Recognition) सारख्या आधुनिक आणि अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध असतील. डिसेंबर महिन्यात लागू होणाऱ्या नवीन नियमांनुसार, आधार कार्डचे ऑफलाईन व्हेरिफिकेशन (Offline Verification) कमी करण्याची तयारी करण्यात येत आहे. खासकरून, हॉटेल (Hotel) बुकिंग किंवा एखाद्या कार्यक्रमात प्रवेश करताना जेव्हा आधार कार्ड मागितले जाते, तेव्हा डेटा लिक (Data Leak) होण्याची भीती कायम असते. नवीन ॲपमुळे ऑनलाईन व्हेरिफिकेशन प्रक्रिया अधिक सुलभ होईल आणि ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत व्यक्तीची माहिती पूर्णपणे गोपनीय राहील. नागरिकांची गोपनीयता जपण्याच्या दृष्टीने UIDAI चा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Comments
Add Comment

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता