महापालिका सहाय्यक आयुक्त सक्तीच्या रजेवर

८० कोटींचे गैरव्यवहार प्रकरण भोवले


मुंबई : महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्या नावाने ८० कोटी रुपयांच्या रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी आरोप होऊ लागल्याने अखेर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी त्यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश जारी झाले आहे. दरम्यान, महेश पाटील यांनी याप्रकरणी पोलिसांच्या चौकशीतून सत्य बाहेर येईल आणि यासाठी पोलिसांना सर्वप्रकारचे सहकार्य केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.


वांद्रे येथील पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणूक केल्यास स्वस्त दरात घरे मिळतील असे आमिष दाखवून तब्बल ८० कोटी रुपयांची रक्कम हडपल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पाटील यांच्यासह थेट उच्चपदस्थ पोलीस तसेच पालिका अधिकारी आणि बॉलीवूड अभिनेत्यांनीही पैसे गुंतवले होत असे बोलले जात आहे. याप्रकरणात आपल्याला महापालिका सहायक आयुक्तांसह इतरांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारदाराने केला. याबाबतचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या प्रकरणी महापालिका सहायक आयुुक्त महेश पाटील यांच्या नावाने आरोप झाल्याने महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी त्यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश जारी केले आहे. त्यानुसार त्यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी