इन्स्टाग्राममध्ये आता स्थानिक भाषेतही नवीन फीचर्स

इंग्रजीमधून मराठीमध्ये व मराठीमधून इंग्रजीमध्ये रील्सचे भाषांतर


मुंबई : इन्स्टाग्रामने मेटासाठी भारताचे महत्त्व लक्षात घेता आणि नवीन वापरकत्यांपर्यंत पोहोचण्याकरिता व वापरकर्त्यांना अधिक सुविधा देण्यासाठी दोन नवीन अपडेट्सची घोषणा केली. यामध्ये पाच नवीन भारतीय भाषांमध्ये मेटा एआय वॉईस भाषांतराचे विस्तारीकरण आणि एडिट्सवर नवीन भारतीय फॉण्ट्सच्या सादरीकरणाचा समावेश आहे.


इन्स्टाग्रामने सांगितले की आगामी महिन्यांपासून व्यक्ती मेटा ए आयचा वापर करत पाच नवीन भारतीय भाषांमध्ये रील्सचे भाषांतर करू शकतील, ज्यामुळे वापकरर्त्यांना भारतातील व जगभरातील अधिकाधिक मनोरंजनपूर्ण मजकुराचा शोध घेण्यास मदत होईल. या ऑक्टोबरमध्ये इन्स्टाग्रामने वापरकर्त्यांसाठी नवीन सेवा लाँच केली, होती ज्यामुळे ते इंग्रजी, हिंदी, स्पॅनिश व पोर्तुगीज या भाषांमधून व त्या भाषांमध्ये त्यांचे रील्स डबिंग व लिप-सिंक करू शकतात, ज्यासह ते जागतिक स्तरावर अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचू शकतात. हीच क्षमता लवकरच बंगाली, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मराठी या भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.


वापरकर्त्यांना मेटा एआयचा वापर करत त्यांचे रील्समध्ये बदल करण्याचा पर्याय असेल, ज्यामुळे रील्समध्ये जगात काही सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमधील भाषांतरासह बदल करता येतील. यासह क्रिएटर्सना जगभरातील अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची उपस्थिती निर्माण करण्यास मदत होईल. बदल केल्यानंतर टूल क्रिएटरचा आवाज व टोन कायम ठेवते, ज्यामुळे भाषांतर केलेले रील्स वास्तविक वाटतात. क्रिएटर्स लिप-सिंकिंग वैशिष्ट्याचा देखील वापर करू शकतात.

Comments
Add Comment

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका