बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण


कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे उघड्या ड्रेनेजमध्ये पडून आयुष कदम या १४ वर्षीय बालकाचा मृत्यू नवरात्रीदरम्यान झाला होता. या गंभीर घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तातडीने दखल घेत संबंधित कडोंमपा अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश कल्याण परिमंडळ पोलीस उपायुक्तांना दिले आहेत. २८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री डोंबिवली सरेवरनगर परिसरात खुल्या ड्रेनेजजवळून जाताना आयुषने आपले प्राण गमावले.


परिसरात सुरू असलेल्या नाले, ड्रेनेज कामात सुरक्षा उपाययोजना न पाळणे, अंधार व चेतावणी फलकांचा अभाव, तसेच पालिकेच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते आणि उच्च न्यायालयातील अधिवक्ता ॲड. डॉ. राजू राम व ॲड. शिल्पा राम यांनी महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाकडे तक्रार केली होती.तक्रारीमध्ये जबाबदार अधिकारी व ठेकेदारांची उच्चस्तरीय चौकशी करून, फौजदारी कारवाई करण्यात यावी तसेच पीडित कुटुंबाला तत्काळ ५० लाख ते १ करोड रुपयांची नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती.


आयोगाने तात्काळ कारवाई करत तक्रारीची छाननी केल्यानंतर कल्याण-डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर प्राथमिक जबाबदारी निश्चित केली. पोलीस उपायुक्तांना तात्काळ अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. मृत बालकाच्या पालकांना मानवी आधारावर आर्थिक नुकसान भरपाईची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश दिले. दोषींवर आवश्यक ते फौजदारी प्रशासकीय कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. ॲड. डॉ. राजू राम म्हणाले, “उघड्या ड्रेनेजमुळे एका निष्पाप बालकाचा मृत्यू हा प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणाचा परिणाम आहे. बालकाच्या कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय आणि जबाबदारांवर कठोर कारवाई न झाल्यास अशा दुर्घटना
थांबणार नाहीत.


नागरिकांचे, बालकांचे मूलभूत हक्क सुरक्षित ठेवणे ही पालिकेची आणि राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे आणि ते हक्क त्यांना मिळालेच पाहिजे, नागरिकांच्या व बालकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू''.

Comments
Add Comment

संजय गांधी उद्यानात तीन छाव्यांचे आगमन

कांदिवली: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली

मुंबईत पश्चिम रेल्वेचा मेगा ब्लॉक

मुंबई : कांदिवली आणि बोरिवली विभागादरम्यान सहाव्या मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे २०/२१

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

बायोकॉन हेल्थकेअर कंपनीकडून ४१५० कोटीची QIP निधी उभारणी

मोहित सोमण: बायोकॉन या जागतिक दर्जाच्या हेल्थकेअर कंपनीने ४१५० रूपयांची गुंतवणूक इक्विटी क्यूआयपी (Qualified Institutional

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण