Rashmika Vijay Wedding रश्मिकाला मंगळसूत्र घालताना थरथरले विजयचे हात, म्हणाला, "तिला काहीच वाटत नव्हतं, पण मी मात्र

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वांत लाडकी जोडी, म्हणजेच अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोडा अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे अत्यंत शाही थाटात आणि पारंपरिक पद्धतीने या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. गेल्या सात वर्षांपासून ही जोडी एकमेकांना डेट करत होती, मात्र त्यांनी कधीही जाहीरपणे आपल्या नात्याची कबुली दिली नव्हती अखेर लग्नाच्या अवघ्या दोन दिवस आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सुखद धक्का देत त्यांनी आपल्या लग्नाची बातमी शेअर केली केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, रश्मिका आणि विजय पडद्यावर लग्नबंधनात अडकण्याची ही पहिली वेळ नाही. २०१८ मध्ये 'गीता गोविंदम या सुपरहिट सिनेमाच्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती. या सिनेमातील त्यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना वेड लावले होते. या सिनेमाचा शेवटचा सीन त्यांच्या लग्नावरच चित्रित करण्यात आला होता. मात्र, रंजक गोष्ट अशी की, त्यावेळी तो लग्नाचा सीन शूट करताना विजय देवरकोंडाला काहीसं विचित्र आणि दडपणाखाली असल्‌यासारखं वाटत होते. कोणाला माहीत होते की, पडद्यावरचं ते 'रील' लग्न एक दिवस उदयपूरच्या शाही थाटात 'रिअल' सम्मात रूपांतरित होईल



मंगळसूत्राच्या तीन गाठी बांधताना भी प्रचंड घाबरलो होतो...


उदयपूरच्या शाही विवाहसोहळ्ळ्यानंतर अभिनेता विजय देवरकोंडा याने आपल्‌या लग्नाचे अनुभव आणि रश्मिकाबद्दलच्या भावना अत्यंत मोकळेपणाने व्यक्त केल्या आहेत. विजयने त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, 'गीता गोविंदम' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा तो पहिल्यांदा रश्मिकासोबत लग्नाचा सीन शूट करत होता, तेव्हा तो प्रचंड दडपणाखाली होता विजयच्या मते, मंडपात बसणे इथपर्यंत ठीक होते, पण जेव्हा रश्मिकाच्या गळ्यात मंगळसूत्राच्या तीन गाठी बांधायची वेळ आली, तेव्हा तो खरोखरच घाबरला होता. रश्मिका 'पाट्टी' साडीत आणि विजय 'पाट्टू पंचा या पारंपरिक वेशात असल्याने त्याला सर्व काही वास्तव वाटत होते. रश्मिकासाठी ते तिचं तिसरे ऑनस्क्रीन लग्न असल्याने तिला फारसं काही वाटत नव्हतं, पण विजय मात्र कमालीचा अस्वस्थ झाला होता आणि त्याने रश्मिकाला हे सर्व खूप 'विचित्र' वाटत असल्याचेही बोलून दाखवले होते. लग्नानंतर आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना किल्यने रश्मिकासाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले की, "एके दिवशी मला तिची इतकी तीव्र आठवण आली की मला जाणवले, जर ती माझ्यासोबत असती तर माझा तो दिवस अधिक सुंदर झाला असता जर ती जवळ असती तर माझ्या जेवणाची चव वाढली असती आणि माझे वर्कआऊटही अधिक जोमाने झाले असते. मला जीवनाच्या प्रत्येक क्षणी फक्त आणि फक्त तिचीच गरज आहे, हे उमजल्यामुळेच मी माझ्या सर्वात चांगल्या मैत्रिणीला आता माझी अर्धांगिनी बनवले आहे. विजयच्या या रोमँटिक पोस्टने चाहत्यांची मने जिंकली असून त्यांच्या या प्रवासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


रश्मिका हिने देखील भावूक पोस्ट शेअर केली आहे 'आता भेट करून देते माझ्या पतीसोबत.. श्री विजय देवरकोडा! अशी व्यक्ती ज्याने मला खरे प्रेम करणं शिकवलं आहे. असा व्यक्ती ज्याने मला शांतीचा अनुभव करुन दिला आहे. असा व्यक्ती ज्याने मला मोठे स्वप्न पाहण्यासाठी सांगितले आहे. ज्यामला मला स्वतःवर विश्वास ठेवण्यास सांगितलं आहे असं रश्मिका म्हणाली आहे. लग्नानंतर रश्मिका आणि विजय यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट