मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पेण दौरा रद्द

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील नगरपालिकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, या प्रचाराकडे सर्वच राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. या निवडणुकीची स्थानिक नेत्यांवरच प्रचाराची धुरा असल्याने त्यांनाही जिल्ह्याबाहेर जात येत नसून, जाहीर प्रचार सभांपेक्षा घरोघरी, दारोदारी मतदारांना भेटण्यावरच उमेदवारांचा जास्त भर आहे.


रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड-जंजिरा, रोहा, महाड, पेण, उरण, कर्जत आणि माथेरान या दहा नगरपरिषदांसाठी निवडणूक होत आहे. जिल्ह्यातील दहा नगर परिषदांमधील दहा नगराध्यक्ष पद ३४ आणि २०९ नगरसेवक पदांसाठी ५९५ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील भाजप-शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची महायुती, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट-शिवसेना उबाठा गट अशी महाविकास आघाडी आहे. मात्र जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकांमध्ये सोयीप्रमाणे युत्या आणि आघाड्या झालेल्या पाहायला मिळत आहेत.


उमेदवार अर्ज माघारी आणि निवडणूक चिन्ह वाटपानंतर जिल्ह्यातील निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. युती आणि आघाडीच्या नेते आणि उमेदवारांनी आपआपल्या विभागात जोरदार प्रचार सुरु केला आहे. जिल्ह्यातील सत्ताधारी सर्व खासदार-आमदार प्रचारात उतरले आहेत. काही नगरपरिषदांमध्ये युतीसह आघाडीतील घटक पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने प्रचाराची धार वाढत आहे. कर्जतमध्ये युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मंत्री आशीष शेलार, तर मंत्री शंभुराज देसाई यांचा माथेरानमध्ये प्रचार दौरा झाला आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पेणमधील प्रचार दौरा रद्द झाला, तर महाडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार असल्याचे सांगितले जात होते. त्यांचाही अद्याप प्रचार दौरा झालेला नाही. आता जाहीर प्रचारासाठी काही काळ बाकी असल्याने प्रचाराची धुरा स्थानिक पातळीवर नेतेच सांभाळीत असल्याचे दिसून येत आहे.


रायगड जिल्ह्यात विविध पक्षांचे स्टार प्रचारक निवडणूक प्रचारात उतरतील असे सुरुवातीला चित्र होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पेणमध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचारासाठी येतील असे सांगितले जात होते, मात्र अद्याप त्यांची पेणमध्ये सभा झालेली नाही, तर महाडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार असल्याचे सांगितले जात होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांचीही जिल्ह्यात प्रचार सभा झालेली नाही. एखाद-दुसरा अपवाद वगळता, राज्यातील मोठे नेते जिल्ह्यात प्रचारासाठी फिरकलेले दिसत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेत्यांनाच प्रचाराची धुरा सांभाळावी लागत आहे.

Comments
Add Comment

धाराशिवमध्ये हिट अँड रन, ऊसतोड मजुरांना उडवले

धाराशिव : धाराशिवमधील कळंब लातूर रस्त्यावर हिट हिट अँड रनची घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या कारने ऊसतोड

अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासूबाई? मधील पाहिलं शीर्षक गीत प्रदर्शित

मुंबई : सासू आणि सुनेमधील खट्याळ नात्याची मजेशीर झलक दाखवणारा केदार शिंदे दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट ‘अगं

२२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सुरूवात ९ जानेवारीपासून

मुंबई : महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा ‘२२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ दिनांक ९

उड्डाणानंतर दिल्ली - मुंबई विमानात बिघाड, इंजिन हवेतच पडलं बंद

नवी दिल्ली : दिल्लीहून मुंबईकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाणानंतर अवघ्या ४० मिनिटांत तांत्रिक

लोणावळ्यात महिलेचा फळविक्रेती ते नगरसेविकापर्यंतचा प्रवास

लोणावळा : लोणावळ्यातील फळविक्रेती भाग्यश्री जगताप यांच्यावर मतदारांनी मोठा विश्वास दाखवत त्यांना नगरसेविका

पर्यटकांसाठी खुशखबर! कोकण रेल्वेवर नाताळ-नवीन वर्षासाठी विशेष गाड्या

मुंबई : नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या