वायू प्रदूषण हे मुंबईतील सर्वांत गंभीर नागरी आव्हानांपैकी एक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - 'वायू प्रदूषण हे मुंबईसमोर उभ्या असलेल्या सर्वात गंभीर नागरी आव्हानांपैकी एक आहे. एनसीएपी अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेने धूळ नियंत्रण यंत्रणेच्या सहाय्याने रस्ते स्वच्छता, कचरा व्यवस्थापन सुधारणा इत्यादींसारख्या प्रयत्नांना अधिक बळकटी दिली आहे. ‘ग्रीन लिव्हिंग, बेटर टुमॉरो’ हा उपक्रम लहान आणि दैनंदिन कृतींवर भर देतो, ज्यामुळे पर्यावरणावर मोठा सकारात्मक परिणाम होऊ शकतो,असे मत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातील कार्यकारी अभियंता वर्षा आठल्ये यांनी व्यक्त केले



महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, महापालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग) अविनाश काटे यांच्या देखीरेखीत पर्यावरणाच्या दृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच अनुषंगाने, केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्रालयाकडून राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम (एनसीएपी) अंतर्गत केंद्र शासन, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी कार्य मंत्रालय यांच्या सहकार्याने, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (एआयआयएलएसजी) यांचे रिजनल सेंटर फॉर अर्बन अँड एन्वायरमेंटल स्टडीज (आरसीयूईएस) यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिका उपायुक्त (पर्यावरण आणि वातावरणीय बदल) अविनाश काटे, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (एआयआयएलएसजी) यांचे रिजनल सेंटर फॉर अर्बन अँड एन्वायरमेंटल स्टडीजचे(आरसीयूईएस) संचालक डॉ. अजित साळवी, विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक विजय रायसिंघानी, अधिष्ठाता प्रदीपकुमार मित्रा आदी या यावेळी उपस्थित होते. तर, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी यात मोठ्या संख्येने सहभागी झाले. चेंबूर येथील विवेकानंद शैक्षणिक संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च येथे शुक्रवारी २८ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे मत मांडले. तरुण हे बदलाचे खरे वाहक आहेत. आजच्या उपक्रमांमुळे विद्यार्थी पर्यावरण संवर्धनात प्रभावीपणे योगदान देऊ शकतात, हे दिसून येते, असे त्यांनी यावेळी नमूद केले.


पर्यावरण आपली जबाबदारी, ओला कचरा - सुका कचरा वर्गीकरण, वायू प्रदूषण नियंत्रण, पर्यावरणीय सामाजिक शिक्षण आदी विषयांवरील प्रकल्पांना मान्यवरांनी भेट देऊन युवकांच्या संकल्पना जाणून घेतल्या. स्पर्धेतील प्रकल्प, पोस्टर, लघूपट आदींचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. तर, मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


.......................


रिजनल सेंटर फॉर अर्बन अँड एन्व्हायरमेंटल स्टडीजचे संचालक डॉ. अजित साळवी म्हणाले, महानगरपालिकेने राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमासाठी घेतलेला पुढाकार अतिशय महत्त्वाचा आहे. अशा उपक्रमांमध्ये तरुणांना सहभागी करुन घेणे अत्यंत मोलाची बाब आहे. आज हे युवक पुढच्या पिढीसाठी चांगले पर्यावरण आणि उत्तम पृथ्वीसाठी योगदान देतील. त्यामुळे, नक्कीच पुढील पिढ्यांना फायदा होईल.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती