प्रारुप मतदार यादीवरील हरकती, सुचनांची गांभीर्याने दखल घ्या

महापालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ भूषण गगराणी यांचे निर्देश


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रारूप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट असलेल्या संबंधित विधानसभा क्षेत्रांच्या १ जुलै २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या आधारे, प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आलेली आहे. या प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना नोंदविण्यासाठी ३ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत निश्चित करण्यात आली आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व हरकती व सूचनांची गांभीर्यपूर्वक आणि काटेकोरपणे दखल घ्यावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिले आहेत. १ जुलै २०२५ रोजीच्‍या विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही चुकीच्‍या प्रभागात नावे समाविष्‍ट करण्‍यात आल्‍याचे हरकतीद्वारे निदर्शनास आल्‍यास सक्षम प्राधिकारी यांनी तात्‍काळ स्‍थळ पाहणी करून खातरजमा करावी आणि अंतिम निर्णय घ्‍यावा, असेही गगराणी यांनी नमूद केले.


प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत शुक्रवारी २८ नोव्‍हेंबर २०२५ रोजी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्‍पती उद्यान व प्राणिसंग्रहालय येथील पेंग्विन कक्ष इमारतीत बैठक पार पडली. महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी अध्‍यक्षस्‍थानी होते. त्‍यावेळी त्‍यांनी हे निर्देश दिले. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ.अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सहआयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) विश्‍वास शंकरवार, सहायक आयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) डॉ. गजानन बेल्‍लाळे, कोकण विभागाच्‍या अपर आयुक्‍त फरोघ मुकादम, उपजिल्‍हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई उपनगर जिल्हा) अर्चना कदम, उपजिल्‍हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर जिल्हा) श्यामसुंदर सुरवसे यांच्‍यासह परिमंडळ उप आयुक्‍त, सर्व विभागांचे सहायक आयुक्‍त तसेच प्रारुप मतदार यादी हरकत व सूचना कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी म्‍हणाल्‍या की, प्रारुप मतदार यादीवर हरकती, सूचना तसेच आक्षेप येत आहेत. हरकती, सूचना दाखल करण्यासाठी आलेले नागरिक तसेच राजकीय पदाधिका-यांचे म्हणणे व्यवस्थितपणे ऐकून घेतले पाहिजे. संवेदनशीलतेने सर्व प्रक्रिया हाताळताना राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जोशी यांनी दिले. विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार म्‍हणाले की, मतदारांच्या सोईसाठी महानगरपालिका मुख्यालय तसेच २४ प्रशासकीय विभाग (वॉर्ड) कार्यालयांमध्ये मतदार सहायता केंद्र (हेल्प डेस्क) सुरू करण्यात आले आहेत. संभाव्य दुबार मतदारांबाबत प्रत्येक सहायता केंद्रात माहिती देण्यात येईल. तसेच, दुबार मतदारांशी निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून संवाद साधला जाईल. प्रारुप मतदार यादीवर प्राप्त होणा-या हरकती व सूचनांची छाननी करुन निर्णय घेण्यासाठी विभागांच्‍या सहायक आयुक्‍त यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.


राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार, प्रसिद्ध झालेल्‍या प्रारुप मतदार यादीमध्‍ये जर काही लेखनिकांच्या चुका (नाव, लिंग, चुकीचे टंकलेखन), दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले आणि १ जुलै २०२५ च्या विधानसभा मतदार यादीत नावे असूनही संबंधित प्रभागात नाव समाविष्ट झालेले नाही, मतदार यादीत मृत व्यक्तींची नावे आढळल्यास किंवा त्याबाबत हरकती किंवा सूचना प्राप्त झाल्यास त्याची नोंद 'मार्क कॉपी'मध्ये घेण्यात यावी. अशा बाबी स्वत:हून अथवा अन्य मार्गाने निदर्शनास आणण्यात आल्यास त्याची तात्काळ दखल घ्‍यावी. प्रभागवार अंतिम मतदार यादी तयार करताना त्या चुकांची दुरुस्ती करावी. संबंधित मतदार योग्य प्रभागात समाविष्ट झाले आहेत किंवा कसे याची तपासणी करावी. जर, मतदार चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाले असतील तर त्या मतदारांना योग्य प्रभागात समाविष्ट करावे, असे बालमवार यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

FDA Raid : सीसीआय', 'एमआयजी क्लब', जुहू जिमखान्यासह नामांकित क्लबवर 'एफडीए'ची कारवाई

परवाने निलंबित; स्वयंपाकघरांमध्ये माश्या, झुरळांचा सुळसुळाट, बुरशी लागलेल्या भाज्या आणि अस्वच्छतेचे

Drug Free Mumbai : 'ड्रग्ज फ्री मुंबई'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी ३० जुलै २०२६ रोजी शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  तरूणाईला व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी योग्य

Devendra Fadnavis : पालघरच्या महापूर बाधितांसाठी एकात्मिक मदत आराखडा करावा

मुंबई : पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा असल्याने या अनुषंगाने भविष्यातील विविध

Nitesh Rane : मोर्शीतील अत्याधुनिक मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

अमरावती : राज्यातील मत्स्य शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे उभारण्यात

Drugs Free Mumbai : 'ड्रग्स फ्री मुंबई' मॉडेलचा राज्यभर विस्तार; राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समिती' स्थापन होणार

मुंबई : मुंबई शहरात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाचे मॉडेल आता

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त