स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना हिरवा कंदील; प्रचार रंगत असतानाच काँग्रेस आणि पवार गटाला धक्का

राज्यातील नगरपरिषद, नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेचे पालन करून, तसेच प्रलंबित याचिकांच्या निर्णयाधीन राहून आगामी निवडणुका घेण्यास परवानगी दिली. त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाने पक्षांना प्रचारासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध करून दिल्यानंतर राजकीय वातावरण अधिक तापले आहे. परंतु प्रचाराची धावपळ वाढत असतानाच काँग्रेस आणि शरद पवार गटाला मोठा फटका बसला आहे.



चिपळूणमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार


चिपळूण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली असून, त्यांचा काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सुधीर शिंदे यांच्याशी थेट सामना होणार आहे. यामुळे काँग्रेसचे दोन समांतर गट सक्रिय झाले असून अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे.


काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित असलेल्या शहांचा नामनिर्देशन अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला. पक्षाने कारवाई करत त्यांना निलंबित केले. शहांनी उमेदवारी प्रक्रियेत पक्षाने अन्याय केल्याचा आरोप केला असून, सुधीर शिंदे यांना “शिंदे गटातून आणून दोन एबी फॉर्म दिले”, असा गंभीर दावा त्यांनी केला आहे.


दुसरीकडे सुधीर शिंदे यांनी पूर्वी शिंदे गटाकडून नगराध्यक्षपदाचे आश्वासन मिळाले होते; ते न मिळाल्याने काँग्रेसने दिलेली संधी स्वीकारल्याचे सांगून आपली भूमिका स्पष्ट केली. या सगळ्या घडामोडींमुळे चिपळूणमध्ये काँग्रेसची निवडणूक लढत चर्चेचा विषय ठरत आहे.



परळीत पवार गटाला मोठा धक्का


परळीमध्ये शरद पवार गटाचे फुलचंद कराड यांनी शिवसेना गटात प्रवेश केला. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आपल्याकडे ठोस पर्याय उरला नव्हता आणि आता शिंदे हेच आपले नेते असल्याचे कराड यांनी जाहीर केले.


कराड यांनी पवारांविषयी कुठलीही नाराजी नसल्याचे सांगितले, मात्र पक्षाच्या खालच्या पातळीवर स्वत:ला सतत डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळूनही त्यांनी पक्ष सोडला नव्हता; पण नंतरच्या नियुक्त्यांमध्ये डावलल्याने आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीही आपली दखल न घेतल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कराड यांनी काही दिवसांत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारात युतीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्याचे संकेत दिले आहेत.

Comments
Add Comment

Rajesh Aggarwal : राजेश अगरवाल महाराष्ट्राचे मुख्य सचिव, चार अधिकाऱ्यांची संधी हुकली

मुंबई : राजेश अगरवाल महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सोमवार १ डिसेंबर २०२५ पासून पदभार स्वीकारणार आहेत.

महाराष्ट्रातील ७५ गावं स्मार्ट होणार; गावात सीसीटीव्ही, वाय-फाय, डिजिटल शिक्षण व्यवस्था उपलब्ध होणार

मुंबई : महाराष्ट्रातील गावांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाची गंगा पोहोचावी यासाठी राज्य सरकार अभिनव उपक्रम राबवत

एक्सप्रेस वे मुळे दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त १२ तासांत होणार

सूरत : एक्सप्रेस वे मुळे दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त १२ तासांत करता येईल. सर्व अडथळे दूर करून हा प्रकल्प लवकर पूर्ण

गोव्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते ७७ फुटी रामाच्या मूर्तीचे अनावरण

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात रामाच्या जगातील सर्वात उंच ७७ फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण केले .

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय, जन्मतारखेचा पुरावा म्हणून ‘आधार कार्ड’ ग्राह्य नाही

मुंबई : जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारण्यावर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सरकारने बंदी घातली आहे.

मुख्य बँक खात्यातून यूपीआय पेमेंट केल्याने डिजिटल फसवणुकीचा धोका वाढतो- पत्रात भारती एअरटेलच्या गोपाळ विठ्ठलांचा मोठा खुलासा

प्रतिनिधी: भारतात मोठ्या प्रमाणात डिजिटल फसवणूकीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. वाढत्या सायबर गुन्ह्यांचे केसेस