‘वनतारा’च्या उद्दिष्टांचे जागतिक स्तरावर पुनरुज्जीवन

सीआयटीईएसच्या बैठकीत भारताच्या भूमिकेला मान्यता


जामनगर : उझबेकिस्तानमधील समरकंद येथे नुकतेच पार पडलेल्या ‘सीआयटीईएस’च्या (साईट्स) २०व्या परिषदेच्या बैठकीत स्थायी समिती आणि सदस्य राष्ट्रांनी प्रचंड बहुमताने भारताच्या भूमिकेला ठाम मान्यता दिली. प्राण्यांच्या आयातीसंदर्भात भारताविरोधात कोणतीही कारवाई करण्यासारखे पुरावे किंवा कारणे नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.


या निष्कर्षामुळे वनताराच्या कायदेशीर, पारदर्शक आणि विज्ञानाधिष्ठित वन्यजीव संवर्धन मॉडेलची ठोस पुष्टी झाली असून, जागतिक नियमांचे पालन करणारे आणि नैतिकदृष्ट्या सर्वाधिक सुशासित असे वन्यजीव संवर्धन केंद्र म्हणून वनताराची प्रतिष्ठा अधोरेखित झाली. जागतिक वन्यजीव नियमपालनाचे मूल्यमापन करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांशी संबंधितसचिवालयाने सप्टेंबर २०२५ मध्ये वनताराची दोन दिवस तपासणी केली. या भेटीत त्यांनी वनतारातील प्राणीसाखळी, पशुवैद्यकीय व्यवस्था, नोंदी, बचावकार्य आणि कल्याण प्रक्रियेची सखोल छाननी केली.


३० सप्टेंबर २०२५ रोजी स्थायी समितीकडे सादर केलेल्या अहवालात सचिवालयाने वनताराला अत्याधुनिक पायाभूत सुविधा, प्रगत पशुवैद्यकीय सेवा आणि सक्षम बचाव-पुनर्वसन प्रणाली असलेले, जगातील सर्वोत्तम कल्याणकेंद्रित संस्थांपैकी एक म्हणून मान्यता दिली. त्यांनी स्पष्टपणे नोंदवले की, वनताराचे कार्य प्राणीकल्याण आणि संवर्धनावर आधारित आहे आणि ही संस्था कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक प्राणी व्यापारात सहभागी नाही. वनताराचे खुलेपण, सहकार्य व संबंधित प्रक्रियांशी सुसंगतता यांचाही त्यांनी उल्लेख केला.


रविवारी स्थायी समितीतील चर्चेत सदस्य देशांच्या प्रचंड बहुमताने भारताच्या भूमिकेला दिलेले समर्थन हे वनताराच्या प्रामाणिकपणाचे व उद्दिष्टांचे जागतिक स्तरावर पुनरुज्जीवन आहे. यामुळे चुकीच्या समजुती दूर होऊन जनमतात पसरलेल्या अपूर्ण किंवा दिशाभूल करणाऱ्या कथनांना वस्तुनिष्ठ आधार मिळाला आहे. वनतारा संवर्धन, नियमपालन आणि प्राणीसेवा या तिन्ही क्षेत्रांत योग्य पद्धतीने कार्यरत आहे.


पक्षकारांचा हा व्यापक पाठिंबा भारताच्या अंमलबजावणी चौकटीवरील विश्वास दृढ करणारा आहे, तसेच स्थापना दिनापासून वनताराने या मानकांचे सातत्याने पालन केल्याची आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली आहे. जागतिक संवर्धन क्षेत्रातील वनताराच्या योगदानाचे हे एक प्रभावी प्रमाणपत्र आहे.


हे आंतरराष्ट्रीय निष्कर्ष भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) निष्कर्षांची पूर्णपणे जुळणारे आढळून येतात. एसआयटीने वनताराविरुद्धच्या सर्व आरोपांची कायदेशीर, आर्थिक, कल्याणविषयक तसेच साईट्ससंदर्भात सखोल चौकशी केली. दस्तऐवज परीक्षण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांशी सल्लामसलत आणि जामनगर सुविधेची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर एसआयटीने सर्व तक्रारी आणि माध्यमांमध्ये व्यक्त झालेले आरोप ‘समर्थन न होणारे, आधारहीन आणि कायदेशीर व तथ्यात्मक पुराव्यांपासून पूर्णपणे दूर’ असल्याचे नमूद केले.


तपासणीत हेही स्पष्ट झाले की, सर्व प्राणी वैध आयात परवानग्यांसह आणि गैर-व्यावसायिक उद्देशांसाठीच आणले गेले, कोणतीही वन्यजीव तस्करी, मनी लॉन्डरिंग किंवा आर्थिक अनियमितता झालेली नाही आणि इनव्हॉइसविषयक उल्लेख हे केवळ सीमाशुल्क मूल्यांकनाची नियमित प्रक्रिया होती. तसेच, वनतारा केवळ केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांचे पालन करतेच असे नाही, तर ते मानकांपेक्षा अधिक काटेकोरपणे पाळते. त्याला ‘ग्लोबल ह्यूमेन सर्टिफाइड’ दर्जा आहे आणि ते खासगी संकलन नसून एक प्रमाणित, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र आहे.

Comments
Add Comment

IND vs SA : संजूचा नादच खुळा! १००० धावांचा टप्पा पार करत अभिषेक-सूर्याच्या पंगतीत पटकावले स्थान

भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात आपल्या

पंतप्रधान येत्या २० आणि २१ डिसेंबरला आसाम दौऱ्यावर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २० आणि २१  डिसेंबरला आसामला भेट देणार आहेत. दिनांक २० डिसेंबर रोजी दुपारी ३

SIR तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगाल दौरा, ३२०० कोटींचे प्रकल्प सुरू

मुंबई : सध्या पश्चिम बंगालमध्ये SIR मुद्द्यावरून तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताला मोठ्या लढाईत गुंतवून ठेवण्याचा डाव ?

कोलकाता : बांगलादेशमध्ये एकीकडे जमिनीवर भारतविरोधी आंदोलनांना धार येत असतानाच, दुसरीकडे समुद्रातही तणाव

ओला-उबरला टक्कर; १ जानेवारीपासून भारत टॅक्सी ॲप सुरू होणार

मुंबई : प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे, ओला आणि उबरसारख्या खासगी टॅक्सी सेवांना पर्याय ठरणारे भारत

Indian Railways : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! वेटिंग आणि RAC तिकिटांचे नियम बदलले, आता रात्री झोपण्यापूर्वीच...रेल्वेची मोठी अपडेट वाचा

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेकदा रेल्वे