पुणे : पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी (Hinjawadi, Pune) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. इथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मिळून तब्बल वीस लहान मुलांना अंगणवाडीमध्ये कोंडून ठेवल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. हिंजवडीतील अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये हा प्रताप घडला आहे. या घटनेचा जो व्हिडिओ व्हायरल झालाय त्यात लहान मुले अक्षरशः घाबरून रडत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. चिमुकल्यांना अशाप्रकारे कोंडून ठेवल्याचे पाहून पालकांनी आणि परिसरातील नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. अंगणवाडीतील सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी हा प्रताप केल्याचे उघड झाले आहे. ज्या ठिकाणी मुलांची काळजी घेणे अपेक्षित आहे, त्याच ठिकाणी त्यांच्यावर असा मानसिक आघात झाल्यामुळे पालकांमध्ये तीव्र असंतोष आहे. पालकांनी या सेविका आणि मदतनीस यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
'माजी सरपंचाने बैठकीला बोलावले म्हणून...'
पुण्यातील हिंजवडी येथील अंगणवाडीत २० निष्पाप मुलांना आतमध्ये कोंडून ठेवण्याच्या धक्कादायक घटनेनंतर आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी या कृतीमागील धक्कादायक खुलासा केला आहे. सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी स्पष्ट केले की, ग्रामपंचायतीतील एका माजी सरपंचाने बैठकीसाठी बोलावले म्हणून त्यांनी मुलांना आतमध्ये ठेवून अंगणवाडीला कुलूप लावले आणि त्या बैठकीसाठी निघून गेल्या. काल, बुधवार (दि. २६) रोजी सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान हा संतापजनक प्रकार घडला. काही वेळेसाठी का असेना, लहान मुलांना अशाप्रकारे अंगणवाडीत कोंडून ठेवणे हे किती धोकादायक आणि संतापजनक आहे, हे व्हायरल झालेल्या व्हिडिओतील मुलांच्या आक्रोशावरून स्पष्ट होत आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी ही कृती अत्यंत गंभीर मानली जात आहे. उपस्थितांनी ही गंभीर बाब तात्काळ मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांच्या निदर्शनास आणून दिली. गिराम यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, सेविका शिंदे आणि साखरे या दोघींना बैठक सोडून तात्काळ अंगणवाडीचे कुलूप उघडण्याचे आदेश दिले. आता या घटनेनंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी या सेविका आणि मदतनीस यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिक : नाशिक शहरातील हिरावाडी परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पतीसह सासरच्या नातेवाइकांकडून होणाऱ्या सततच्या छळाला ...
नेमकं काय प्रकरण ?
पुण्यातील हिंजवडी परिसरातून एक अत्यंत गंभीर आणि धोकादायक असा प्रकार उघडकीस आला आहे, ज्यामुळे प्रशासकीय निष्काळजीपणावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. येथील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी तब्बल २० लहान मुलांना केंद्रातच बंद ठेवून कुलूप लावल्याचे समोर आले आहे. या दोन्ही अंगणवाडी सेविकांनी हा धक्कादायक प्रकार घडवण्यामागे ग्रामपंचायतीतील एका माजी सरपंचाने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहण्याचे कारण दिले आहे. काल, बुधवार (दि. २६) रोजी सकाळी सुमारे ११ ते १२ या वेळेत हा प्रकार घडला, जेव्हा मुलांना केंद्रातच बंदिस्त करण्यात आले. लहानग्या मुलांना अगदी काही काळासाठीसुद्धा अशा प्रकारे बंदिस्त करून ठेवणे किती घातक आणि धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय व्हायरल झालेल्या व्हिडिओतील मुलांच्या रडण्याच्या आवाजातून स्पष्टपणे येत आहे. या घटनेनंतर चिमुकल्यांच्या पालकांनी आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. उपस्थितांनी ही बाब तातडीने मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांच्याकडे पोहोचवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, गिराम यांनी सेविका शिंदे आणि साखरे यांना तत्काळ बैठक सोडून अंगणवाडीचे कुलूप उघडण्याचे आदेश दिले. या गंभीर निष्काळजीपणावर बाल विकास प्रकल्प अधिकारी आता कोणती कठोर कार्यवाही करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.