आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक सहाय्यता संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे

मुंबई  : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार २०२६ या वर्षासाठी आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक सहाय्यता संस्था अर्थात इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रॅसी अँड इलेक्ट्रोल आसिस्टस (आयडीईए) या आंतर-सरकारी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणार आहेत. ३ डिसेंबर २०२५ रोजी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे होणाऱ्या सदस्य देशांच्या परिषदेत ते औपचारिकरीत्या अध्यक्षपद स्वीकारतील. आगामी वर्षभर ते या संस्थेच्या सर्व महत्त्वाच्या परिषदांचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.


१९९५ मध्ये स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय आयडीईए ही संस्था जगभरातील लोकशाही प्रक्रियेचे बळकटीकरण करण्यासाठी कार्यरत आहे. सध्या ३५ देशांचे या संस्थेचे सदस्यत्व असून अमेरिका आणि जपान हे निरीक्षक देश आहेत. समावेशक, लवचिक आणि जबाबदार लोकशाही व्यवस्थांचा प्रसार हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. अध्यक्षपद मिळणे हा भारताच्या निवडणूक आयोगाच्या जागतिक प्रतिष्ठेचा मोठा सन्मान मानला जात आहे.


जगातील सर्वात विश्वसनीय आणि अभिनव निवडणूक व्यवस्थापन संस्थांपैकी एक म्हणून भारताच्या निवडणूक आयोगाची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख आहे. भारत हा आयडीईएचा स्थापक सदस्य असून विविध लोकशाही उपक्रमांमध्ये त्याचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे.


अध्यक्ष म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा जगातील सर्वात मोठ्या निवडणुकांचे आयोजन करण्यातील भारताचा अनुभव हा संस्थेच्या जागतिक कार्ययोजनेत वापरण्याचा मानस आहे. निवडणूक व्यवस्थापन संस्था यांच्यात ज्ञान-विनिमय, व्यावसायिक नेटवर्किंग आणि पुराव्यावर आधारित जागतिक निवडणूक सुधारणा यांना या सहकार्यातून गती मिळणार आहे. जवळपास एक अब्ज मतदार असलेल्या भारताची पारदर्शक आणि सुबद्ध निवडणूक प्रक्रिया ही जगासाठी आदर्श मानली जाते. आगामी वर्षभर भारत आपल्या उत्तम पद्धती आणि अनुभव आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देणार आहे.


स्थापनेपासून आयआयडीईएमने भारतासह जगभरातील निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. संस्थेने आतापर्यंत २८ देशांबरोबर सामंजस्य करार केले असून १४२ देशांतील ३१६९ निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने