Stock Market विशेष: शेअर बाजारात सेन्सेक्स व निफ्टीत एक टक्क्यांहून अधिक उसळतोय नक्की का? व गुंतवणूकदारांनी काय करावे?

मोहित सोमण: जगभरात प्रभावशाली ठरणाऱ्या युएस अर्थव्यवस्थेतील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल या आशावादाचा जागतिक विश्वात मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. याच धर्तीवर युरोप व जपानमधील वाढत्या आकडेवारीसह आशियाई बाजारात सकाळच्या सत्रात वाढ झाली हीच परिस्थिती भारतीय शेअर बाजारात दिसत आहे. दुपारी १२.२९ वाजेपर्यंत बीएसई व एनएसईवर सेन्सेक्स व निफ्टीत तुफान वाढ झाली आहे. सेन्सेक्स ८६३ व निफ्टी २७३ अंकाने उसळला असल्याने दोन्ही निर्देशांकात १% हून अधिक वाढ झाली असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. सकाळी मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये ब्लू चिप्स कंपनीच्या शेअर पेक्षा अधिक वाढ झाली होती. तसेच बँक, मेटल, फायनांशियल सर्विसेस शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे बाजारात रॅली झाली.


एचडीएफसी (१.२५%), रिलायन्स इंडस्ट्रीज (१.२८%), आयसीआयसीआय सिक्युरिटीज (०.८९%),बजाज फायनान्स (२.५०%), श्रीराम फायनान्स (१.७२%), अदानी एंटरप्राईजेस (०.१८%), अदानी पोर्ट (२.०२%), टाटा स्टील (१.७७%), पीएमपीवी (१.३८%) यांसारख्या बड्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याने बाजारात मोठी वाढ झाली आहे. तज्ञांच्या मते कच्च्या तेलाच्या किंमती जागतिक बाजारपेठेत घसरल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आज मोठ्या प्रमाणात बाजारात गुंतवणूक केली. तज्ञांच्या मते ७८५.३० कोटींची गुंतवणूक वाढल्याने त्याचा फायदा बाजारात होत आहे. अर्थात भारती एअरटेल (१.४२%), महिंद्रा अँड महिंद्रा फिनसर्व्ह (१.६२%),बजाज होल्डिंग्स (०.०५%), बर्जर पेंटस (०.६०%) यांसारख्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने अतिरिक्त रॅली रोखली गेली.


जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ. व्ही.के. विजयकुमार यांनी अलीकडील अस्थिरतेचे कारण फ्युचर्स एक्सपायरी अ‍ॅक्टिव्हिटीला दिले त्यांच्या मते, 'काल निफ्टीमध्ये ७४ अंकांची घसरण झाली असूनही ४६९७ कोटी रुपयांचा सकारात्मक संस्थात्मक खरेदीचा आकडा असूनही काल ही एक्सपायरीशी संबंधित अशा अस्थिरतेचे उदाहरण आहे.'किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम रणनीती म्हणजे व्यापार करण्यापासून दूर राहणे आणि हळूहळू बऱ्यापैकी मूल्यवान उच्च दर्जाचे ग्रोथ स्टॉक जमा करणे.' असे ते पुढे म्हणाले आहेत.


काल परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ७८५.३० कोटींच्या गुंतवणुकी केली होती तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी अंदाजे ३९१२ कोटींची गुंतवणूक केली होती ज्यामुळे देशांतर्गत सहभाग मजबूत असल्याचे दिसून आले. युक्रेन-रशिया यांच्यातील तीढा सुटत आल्याने तेलाच्या किमती प्रति बॅरल $५७.२ पर्यंत घसरल्या होत्या ज्यामुळे बाजारांना अतिरिक्त आधार मिळाला. असे असताना युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीशिवाय आगामी किरकोळ विक्री (Retail Sales) डेटा, पीएमआय डेटा, रोजगार आकडेवारी, उत्पादन निर्मिती निर्देशांक अशा विविध आगामी आकडेवारींची प्रतिक्षा गुंतवणूकदार करत असल्याने सोन्यासह बाजारालाही आधार मिळत आहे.


आज दिवसभरात अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा १.४७% घसरला आहे. सुरूवातीच्या कलात तो २% पेक्षा अधिक पातळीवर घसरला होता. त्यामुळे एकूणच बाजारात आज स्थैर्यता असल्याचे स्पष्ट होत आहे. दुपारी नेक्स्ट ५० (१.२७%), बँक निफ्टी (१.२७%), फायनांशियल सर्विसेस (१.२५%), मिडकॅप सिलेक्ट (१.१६%) निर्देशांकात मोठी वाढ झाल्याने बाजार मोठ्या प्रमाणात आणखी उसळत आहे.


काल युएस बाजारात अखेरच्या सत्रात डाऊ जोन्स (०.२९%), एस अँड पी ५०० (०.९३%), नासडाक (०.७१%) निर्देशांकात वाढ झाली. आशियाई बाजारात आज दुपारपर्यंत सेट कंपोझिट (०.३१%), शांघाई कंपोझिट (०.१५%) वगळता इतर निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ तैवान वेटेड (१.८१%), निकेयी २२५ (१.९३%), गिफ्ट निफ्टी (१.१९%) निर्देशांकात झाली आहे.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : राज्यात 60 ‘आदर्श दुय्यम निबंधक’ कार्यालये उभारणार; पुण्यातील कोथरूडमध्ये पहिले कार्यालय

मुंबई : राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नोंदणी

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Nashik FDA Raid : नाशिकमध्ये सणासुदीच्या तोंडावर 'एफडीए'ची मोठी कारवाई

Nashik FDA Raid : नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांच्या

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी