रोहित शर्मा पुन्हा अव्वल स्थानावर

दुबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी (२६ नोव्हेंबर) पुरुषांची फलंदाजी क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत रोहित शर्माने पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेतली आहे. तर डॅरिल मिशेलची या यादीत दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने दमदार शतकी खेळी केली होती. या खेळीच्या बळावर त्याने अव्वल स्थानी झेप घेतली होती. पण त्यानंतर डॅरिल मिशेलने पुन्हा एकदा अव्वल स्थानी कब्जा केला होता. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे मालिकेनंतर भारतीय संघ एकही वनडे सामने खेळण्यासाठी मैदानात उतरलेला नाही. तरीदेखील रोहित पुन्हा एकदा नंबर १ फलंदाज बनला आहे.

डॅरिल मिशेलने वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या वनडे मालिकेत दमदार शतकी खेळी केली होती. या खेळीनंतर त्याने वनडे फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान मिळवलं होतं. त्याने ७६६ रेटिंग पॉईंट्सची कमाई केली आहे. तर अव्वल स्थानी असलेल्या रोहित शर्माने ७८१ रेटिंग पॉईंट्सची कमाई केली आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत झिम्बाब्वेचा अनुभवी खेळाडू सिकंदर रझा अव्वल स्थानी पोहोचला आहे. सिकंदर रझाने आतापर्यंत २८९ रेटिंग पॉईंट्सची कमाई केली आहे. झिम्बाब्वेचा संघ नुकताच पाकिस्तान आणि श्रीलंकेविरूद्ध तिरंगी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या मालिकेत सिकंदर रझाचा बोलबाला पाहायला मिळाला. त्याने पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात फलंदाजी करताना २३ धावा आणि गोलंदाजी करताना २ गडी बाद केले होते. तर श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने ३७ धावा करून ४ गडी बाद केले होते. तर पाकिस्तानचा सईय अयुब या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. सईम अयुबने २६९ रेटिंग पॉईंट्ससह दुसरे स्थान गाठले आहे.

कसोटी फलंदाजांच्या यादीत ट्रॅव्हिस हेड सहाव्या स्थानी पोहोचला आहे. हेडने इंग्लंडविरूद्ध झालेल्या अॅशेस मालिकेतील पहिल्याच कसोटीत दमदार शतकी खेळी केली होती. तर इंग्लंडचा स्टार फलंदाज २४ व्या स्थानी जाऊन पोहोचला आहे. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट या यादीत अव्वल स्थानी आहे. जो रूटची रेटिंग ८८४ इतकी आहे. तर हॅरी ब्रूक ८५३ रेटिंग पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. तर केन विलियम्सन या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. कसोटी क्रिकेटमधील टॉप १० फलंदाजांच्या यादीत यशस्वी जयस्वाल हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. यशस्वी जयस्वाल ८ व्या क्रमांकावर घसरला आहे.
Comments
Add Comment

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो