Anarock अहवालातील माहितीत स्पष्ट -
आर्थिक वर्ष २०२२ पासून टॉप ७ शहरांमध्ये लक्झरी घरांची किंमत ४०% वाढली आहे, तर परवडणाऱ्या घरांची किंमत फक्त २६% आहे.
एमएमआर (Mumbai Metropolitical Region MMR) आणि बेंगळुरूमध्ये या कालावधीत १.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांच्या किमतीत अनुक्रमे ४३% आणि ४२% सरासरी वाढ झाली आहे. तर या प्रदेशात परवडणाऱ्या घरांच्या किंमतीत फक्त २६% सरासरी वाढ
मोहित सोमण: भारतातील महत्वाच्या टॉप ७ शहरांमध्ये लक्झरी निवासी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. एका अहवालानुसार केवळ नवीन पुरवठ्यात नाही तर किमतीतही मागणीमुळे सातत्याने वाढ होत आहे. वेगवेगळ्या बजेट सेगमेंटमधील या शहरांमधील सरासरी किमतीच्या ट्रेंडची आकडेवारी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ॲनारॉक संशोधन विश्लेषणातून दिसून आली आहे. अहवालातील निष्कर्षानुसार गेल्या तीन वर्षांत ४०% दराने, लक्झरी घरांमध्ये सर्वाधिक सरासरी किमतीत वाढ झाली आहे.याविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना ॲनारॉक ग्रुपचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले की,'२०२२ मध्ये टॉप ७ शहरांमधील या घरांच्या किमती सरासरी १४५३० रुपये प्रति चौरस फूट होत्या. २०२५ मध्ये या टप्प्यावर दर सुमारे २०३०० रुपये प्रति चौरस फूट इतके वाढले आहेत. या शहरांमध्ये, दिल्ली-एनसीआरच्या लक्झरी सेगमेंटमध्ये तीन वर्षांत ७२% ची सर्वाधिक वाढ झाली आहे. आर्थिक २०२२ मध्ये अंदाजे १३४५० रुपये/चौरस फूट वरून २०२५ मध्ये आजच्या तारखेनुसार अंदाजे २३१०० रुपये/चौरस फूट दरासह (४३% वर) एमएमआर या बजेट सेगमेंटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला, त्यानंतर ४२% वाढीसह बेंगळुरूचा क्रमांक लागतो.'
निष्कर्षानुसार, एमएमआरमध्ये, आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १.५ कोटी रुपये श्रेणीतील सरासरी किंमत २८०४४ रुपये/चौरस फूट होती सध्या ती ४०२०० रुपये/चौरस फूट आहे. बेंगळुरूमध्ये, २०२२ मध्ये लक्झरी सेगमेंटची सरासरी किंमत ११७६० रुपये/चौरस फूट होती. आजपर्यंत ते वाढून आता १६७०० रूपये चौरस फूट झाले आहे असे नमूद केले आहे.तसेच या माहितीनुसार, या कालावधीत परवडणाऱ्या घरांच्या सुमारे ४० लाखांपेक्षा कमी किमतीच्या सरासरी युनिट्स किमतीत २६% ची वाढ झाली मध्ये या श्रेणीतील शीर्ष (Top) शहरांमध्ये सरासरी किंमत ४२२०/चौरस फूट होती. सध्या, ती सरासरी ५२९९ रुपये/चौरस फूट आहे.
अहवालातील निष्कर्षानुसार एनसीआर (National Capital Region NCR) मध्ये लक्झरी विभागात सर्वाधिक ४८% सरासरी किमतीत वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ३५२० रूपये चौरस फूट वरून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ५२०० रूपये प्रति चौरस फूटांवर किंमती पोहोचल्या आहेत. हैदराबादमधील बजेट घरांच्या किमतीत या कालावधीत ३५% ची दुसरी सर्वोत्तम वाढ झाली. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये३८८० प्रति चौरस फूट वरून सध्या ५२३४/चौरस फूटांवर या किंमती पोहोचल्या आहेत. अहवालाने म्हटले आहे की,'विशेष म्हणजे, दिल्ली-एनसीआरमध्ये सध्याच्या सरासरी परवडणाऱ्या किमती हैदराबादपेक्षा थोड्या कमी आहेत.'
उत्कृष्ट ठिकाणी ब्रँडेड डेव्हलपर्सकडून मोठ्या घरांसाठी सातत्याने मागणी असल्याने, इतर विभागांपेक्षा आलिशान घरांची मागणी वाढतच आहे असे अनुज पुरी म्हणतात. ते पुढे म्हणाले आहेत की,' आमच्या डेटानुसार, ९ मे २०२५ मध्ये टॉप ७ शहरांमध्ये झालेल्या सुमारे २.८७ लाख युनिट्सच्या एकूण विक्रीपैकी जवळजवळ ३०% विक्री लक्झरी विभागात होती. हे विशेषतः उल्लेखनीय आहे कारण गेल्या काही वर्षांत वाढत्या इनपुट खर्चामुळे आणि मजबूत मागणीमुळे देशभरात घरांच्या किमती वाढल्या आहेत.'
सध्याच्या ट्रेंडवरून असे दिसून येते की लक्झरी रिअल इस्टेट विकास मार्ग अत्यंत शाश्वत (Susitanable) आहे, कारण तो भारतातील एचएनआय (High Net Worth Individual HNIs) आणि अल्ट्रा-एचएनआयएसच्या वाढत्या संख्येमुळे व गुंतवणूकीमुळे आणखी वाढत आहे. भारतातील वाढती संपत्ती निर्मिती (Wealth Creation) आणि आर्थिक स्थिरतेसह लक्झरी मालमत्तेच्या मूल्यांमध्ये स्थिर वाढ देखील या विभागातील दीर्घकालीन वाढीचा एक मजबूत पाया तयार करते असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले.
निष्कर्षानुसार, मागणी आणि विक्रीत परवडणाऱ्या घरांचा विभागांपेक्षा लक्झरी निवासी मागणी अधिक वेगाने वाढत आहे. एकूणच या लक्झरी निवासी विभागात अखेरीस त्याच्या सरासरी २६% वाढीमध्ये देखील दिसून येतो. या कालावधीत, मध्यम श्रेणी आणि प्रीमियम श्रेणीतील घरांची सरासरी किंमत, ज्यांची किंमत ४० लाख ते .१५ कोटी दरम्यान आहे, त्यांच्या किमतीत सरासरी ३९% वाढ झाली. आर्थिक वर्ष २०२ मध्ये ६८८० रूपये प्रति चौरस फूट वरून आर्थिक वर्ष २२०५ मध्ये मध्ये ९५३७ रूपये प्रति चौरस फूटवर किंमती पोहोचल्या.
'किंमत वाढीच्या बाबतीत NCR (दिल्ली महानगर प्रदेश) जवळजवळ सर्व रिअल इस्टेट विभागांमध्ये एक उत्कृष्ट कामगिरी करणारा ठरला आहे आणि येथे लक्झरी घरांची मागणी उल्लेखनीय आहे असे ते म्हणाले आहेत. पुरी पुढे म्हणतात. 'लक्झरी श्रेणीमध्ये ७२%,मध्यम श्रेणी आणि प्रीमियममध्ये ५४% आणि परवडणाऱ्या श्रेणीमध्ये ४८% अशी सर्वोच्च किंमत वाढ झाली आहे ही वस्तुस्थिती या प्रदेशातील सर्वांगीण कामगिरी करणाऱ्या बाजार गतिमानतेशी जुळते.' असेही ते पुढे म्हणाले आहेत.
अतिरिक्त आकडेवारी -
बजेट विभागांमधील सध्याचे किमतींचे ट्रेंड
मुंबई महानगर प्रदेश (एमएमआरमध्ये) सध्या टॉप ७ शहरांमधील सर्व घरांच्या श्रेणींमध्ये सर्वाधिक सरासरी किंमत आहे.
१.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांची सरासरी किंमत सध्या ४०२०० रुपये/चौरस फूट आहेत.
परवडणाऱ्या विभागात, ती ६४५० रुपये/चौरस फूट आहे आणि मध्यम आणि प्रीमियम विभागात, १६४०० रुपये/चौरस फूट आहे.
एनसीआरमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लक्झरी घरांची सरासरी किंमत आहे, जी सध्या २३,१०० रुपये/चौरस फूट आहे. मध्यम आणि परवडणाऱ्या घरांची किंमत अनुक्रमे ९७५० रुपये/चौरस फूट आणि ५२०० रुपये/चौरस फूट आहे.
चेन्नईमध्ये, लक्झरी श्रेणीतील सरासरी किंमत सध्या १८५०० रुपये/चौरस फूट आहे. फूट आहे, तर मध्यम आणि परवडणाऱ्या श्रेणीमध्ये ते अनुक्रमे ७४५० रुपये/चौरस फूट आणि ४८६५ रुपये/चौरस फूट आहे.
बेंगळुरूमध्ये, २०२५ मध्ये आजपर्यंत आलिशान घरांची सरासरी किंमत १६,७०० रुपये/चौरस फूट आहे; मध्यम श्रेणीमध्ये ती ९,१४० रुपये/चौरस फूट आहे आणि परवडणाऱ्या श्रेणीमध्ये ती ५,४५० रुपये/चौरस फूट आहे.
पुण्यात, आलिशान घरांची सरासरी किंमत सध्या १५२०० रुपये/चौरस फूट आहे, तर मध्यम आणि परवडणाऱ्या श्रेणीमध्ये ती अनुक्रमे ८८५० रुपये/चौरस फूट आणि ५८५० रुपये/चौरस फूट आहे.
कोलकातामध्ये, २०२५ मध्ये आलिशान घरांची सरासरी किंमत १४२०० रुपये/चौरस फूट आहे. तसेच मध्यम आणि परवडणाऱ्या श्रेणींमध्ये, ते शीर्ष (Top) ७ शहरांमध्ये अनुक्रमे सर्वात कमी आहे, म्हणजेच ६७५० रुपये/चौरस फूट आणि ४०४० रुपये/चौरस फूट रूपये आहे.
माहितीनुसार, हैदराबादमध्ये, लक्झरी मालमत्तांच्या सरासरी किमतीत ४१% वाढ झाली असली तरी, या श्रेणीतील शहराची सध्याची सरासरी किंमत २०२५ मध्ये कोलकाता शहराच्या तुलनेत सर्वात कमी आहे, जिथे ते १४२०० रुपये/चौरस फूट आहे; मध्यम श्रेणीमध्ये ते ८४२० रुपये/चौरस फूट आणि ५२३५ रुपये/चौरस फूट आहे.